शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

पैसे चोरीच्या संशयावरून विद्यार्थिनीला दिले चटके

By admin | Updated: February 2, 2017 02:55 IST

पनवेल तालुक्यातील सुकापूर येथील जय मल्हार इंग्लिश स्कूलमध्ये ११ वर्षीय विद्यार्थिनीला लोखंडी उलथण्याने चटके दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

पनवेल : पनवेल तालुक्यातील सुकापूर येथील जय मल्हार इंग्लिश स्कूलमध्ये ११ वर्षीय विद्यार्थिनीला लोखंडी उलथण्याने चटके दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पालक तिला भेटण्यासाठी पेणहून पनवेल- सुकापूर येथील शाळेत आल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात शाळेच्या मुख्याध्यापिका सुविधा बेडदे यांच्याविरोधात अ‍ॅट्रॉसिटी व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सुकापूर येथील जय मल्हार इंग्लिश स्कूलमधील शिक्षिकेचे १०० रुपये चोरीला गेल्यावरून शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी १८ जानेवारीला चौथीत शिक्षण घेणाऱ्या हर्षदा गंगाराम लेंडी (११) हिच्यावर चोरीचा आरोप करत शरीरावर लोखंडी उलथण्याने चटके दिले. शाळेत ५५ विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यामधील ३२ निवासी आहेत. पैसे चोरल्यानंतर कबुली दिली नसल्याने मुख्याध्यापिका बडदे यांनी हर्षदाला मारहाण केली व चटके दिले. या घटनेनंतर घाबरून विद्यार्थी गप्प बसले होते. प्रत्येक महिन्याच्या ३० व ३१ तारखेला मुलांचे आई-वडील मुलांना भेटण्यासाठी शाळेत येतात. हर्षदाचे वडील देखील तिला भेटण्यासाठी शाळेत आले असताना तिच्या पाठीवर चटके दिले असल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत त्यांनी तिला विचारले असता या घटनेची माहिती दिली.हा प्रकार गंभीर असल्याने पालकांनी कमलाकर हिलम व इतरांना सोबत घेऊन एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय गाठले व शाळेच्या मुख्याध्यापिकेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तर याच शाळेतील इतर ७ विद्यार्थ्यांनाही शिक्षिकेने चटके दिले असल्याचे कमलाकर हिलम यांनी सांगितले. जयेंद्र मारु ती पिंगळा, जितेश अंबाजी पिंगळा, संतोष गौऱ्या भस्मा,करु णा नांग्या पिंगळा, जान्हवी रामा भस्मा, नरेश लहू उघडा, ओमकार नामदेव शिद अशी अन्य ७ जणांची नावे आहेत. बुधवारी खांदेश्वर पोलीस स्टेशनमध्ये मुख्याध्यापिका सुविधा बेदडे हिच्याविरोधात कलम ३२४ व ५०६ व बाल न्याय अधिनियम मुलांचे काळजी व रक्षण कलम ७५अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास खांदेश्वर पोलीस करत आहेत. मुख्याध्यापिकेवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हाही दाखल केला आहे. मुलांना अन्यायकारक वागणूक व मारहाण करणाऱ्या शिक्षिकेला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी व त्यांच्याविरोधात ३०७ नुसार गुन्हा दाखल व्हावा.- गंगाराम लेंडी, पालकविद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढे तपास करत आहोत. - प्रकाश निलेवाड, सहाय्यक पोलीस आयुक्त