शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

शिवप्रेमींनी गड किल्यांवर साजरा केला दसरा; गडाला बांधले तोरण

By नामदेव मोरे | Updated: October 5, 2022 21:19 IST

पारंपारीक पद्धतीने शस्त्रपुजनासह मिरवणुकीचे आयोजन

नवी मुंबई : दुर्गवीर प्रतिष्ठानच्या माध्यमातून दसऱ्यानिमीत्त आधी तोरण गडाला मग माझ्या घराला हा उपक्रम राबविण्यात आला. रायगड जिल्ह्यातील मृगगड, मानगड व सुरगडसह राज्यातील विविध किल्यांवर पारंपारीक पद्धतीने दसरा उत्साहात साजरा करण्यात आला. गडाला तोरण बांधून, शस्त्रपुजन करत शिवकालीन विशभुषा परिधान करून मिरवणूक काढण्यात आली.

राज्यातील गड, किल्यांचे संवर्धन करण्यासाठी योगदान देणाऱ्या संस्थांमध्ये दुर्गवीर प्रतिष्ठानचाही समावेश आहे. संस्थेच्या माध्यमातून वर्षभर गड संवर्धनासाठी श्रमदान मोहिमांचे आयोजन केले जाते. गडावरील पुरातन वास्तूंचे संवर्धन, स्वच्छता मोहीमा राबविल्या जात आहेत. प्रत्येक वर्षी गडावर दसरा साजरा केला जातो. यावर्षीही संस्थेचे संस्थापक संतोश हसूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली विजयोदुर्गोत्सव मोहीम राबविण्यात आली. रायगड जिल्ह्यामधील मृगगड, मानगड व सुरगड या किल्यांवर पहाटेच दुर्गवीरांनी उपस्थिती लावली.

गडाच्या दरवाजाला तोरण बांधण्यात आले. गडावरील मंदिरामध्ये पारंपारीक पद्धतीने शस्त्र पुजन करण्यात आले. मंदिर, दरवाजांचा परिसर स्वच्छ करण्यात आला. मावळ्यांच्या वेशामध्ये गडावरून मिरवणूक काढण्यात आल्या. शिवकाळात ज्या पद्धतीने गडावर दसरा साजरा केला जायचा, सोने लुटले जायचे त्या पद्धतीने उत्सव साजरा करण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयघोषांनी गडांचा परिसर दुमदुमून गेला होता. मृगगड, मानगड व सुरगडावर सुरू असलेल्या संवर्धन मोहिमा यापुढेही सुरुच ठेवण्याचा निर्धार यावेळी शिवप्रेमींनी केला. गड, किल्यांचे संवर्धन व्हावे. हा ऐतीहासीक ठेवा टिकावा, पुढील पिढीला पाहता यावा, गड किल्यांचा इतिहास, तेथील वास्तूरचना, जलसंवर्धनासाठी केलेल्या उपाययोजना, सुरक्षेसाठी घेतलेली काळजी ही सर्व माहिती पुढील पिढीपर्यंत पोहचविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे व योगदान देण्याचे आवाहन यावेळी शिवप्रेमींनी व्यक्त केले.राज्यभर विजयोदुर्गोत्सव

रायगड जिल्हाप्रमाणे राज्यातील इतर गड, किल्यांवरही दसरा उत्साहात साजरा करण्यात आला. भास्करगड, महिपतगड, महिमतगड, रामगड, कलानिधीगड, सामानगड, सडा किल्ला व इतर किल्यांवरही दसरा साजरा करण्यात आला.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई