शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सीआयएसएफ जवानाकडून अल्पवयीन मुलींचा पाठलाग; नागरिकांनी दिला चोप

By सूर्यकांत वाघमारे | Updated: September 8, 2023 17:54 IST

आर्मीत असल्याचे सांगत जबरदस्तीने बोलण्याचा प्रयत्न 

नवी मुंबई : अल्पवयीन मुलींचा पाठलाग करून त्यांच्याशी जवळकी साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या सीएआयएसएफ जवानावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेमुळे मुली व पालक भयभीत झाले होते. अखेर हा प्रकार उजेडात येताच पोलिसांनी गुन्हा दाखल करून जवानाला अटक केली आहे. 

वाशी सेक्टर ९ येथे अनेक दिवसांपासून हा प्रकार घडत होता. वाशीतील सीएआयएसएफ कॉलनी मध्ये राहणारा सुरजकुमार राम (२५) हा परिसातून ये जा करणाऱ्या अल्पवयीन मुलींचा पायी पाठलाग करत त्यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करत होता. तर मुलींनी त्याच्यासोबत बोलण्यास नकार दिल्यास आपण आर्मीत असल्याचे सांगून मला भाऊ माना असे देखील सांगून तो त्यांच्यासोबत जवळकी साधायला पाहत होता. अनेक मुलींसोबत त्याठिकाणी असा प्रकार घडत असताना काही दिवसांपूर्वी काही नागरिकांनी त्याला मुलींचा पाठलाग करताना पकडून चोप देखील दिला होता.

परंतु घटनेमुळे भयभीत झालेल्या अल्पवयीन मुली व पालक यांनी पोलिसांकडे तक्रार टाळली होती. अखेर सर्व मुली व पालक यांची पोलिसानं भेट घेऊन त्यांना धीर दिल्यानंतर बुधवारी रात्री याप्रकरणी वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये सूरजकुमार याला अटक करण्यात आली आहे. तो मूळचा जम्मूचा असून यापूर्वी वैष्णोदेवी येथे नियुक्ती असताना त्याठिकाणी देखील दोनदा त्याला अशाच प्रकरणातून नागरिकांनी चोप दिल्याचे समोर आले आहे. तर याच कारणावरून त्याच्यावर कारवाई करून नवी मुंबईत बदली करण्यात आली आहे असेही समजते. मात्र वाशीत देखील त्याने असेच कृत्य केल्याने गुन्हा दाखल झाला आहे. तर त्याच्या अशा कृत्यांमुळे त्याच्यावर कठोर कारवाईची मागणी होत आहे.