वसई : वसई-विरार शहर महानगरपालिका झाल्यानंतर वसई रोड, विरार, नवघर - माणिकपूर, नालासोपारा ४ ही शहरे तसेच अन्य गावांमधील फेरीवाल्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. या फेरीवाल्यांकडून मोक्याच्या जागेवर होत असलेले अतिक्रमण लक्षात घेऊन महानगरपालिका प्रशासनाने चारही शहरात फेरीवाला झोन निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. ४ शहरातील फेरीवाल्यांचे सध्या सर्व्हेक्षण सुरू असून फेरीवाल्यांची एकुण संख्या कळल्यानंतर किती व कसे झोन निर्माण करायचे याबाबतचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
वसई-विरारमध्ये लवकरच फेरीवाला झोन
By admin | Updated: November 18, 2014 23:13 IST