शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

वेळापत्रकात बदल केल्याने पालक, विद्यार्थ्यांचे आंदोलन

By admin | Updated: April 18, 2017 06:48 IST

ऐरोली सेक्टर ३ मधील श्रीराम विद्यालयाने कोणतीही पूर्वसूचना न देता शाळेच्या वेळापत्रकात बदल केल्याने संतप्त झालेल्या पालक व विद्यार्थ्यांनी सोमवारी शाळेसमोर ठिय्या आंदोलन केले

नवी मुंंबई : ऐरोली सेक्टर ३ मधील श्रीराम विद्यालयाने कोणतीही पूर्वसूचना न देता शाळेच्या वेळापत्रकात बदल केल्याने संतप्त झालेल्या पालक व विद्यार्थ्यांनी सोमवारी शाळेसमोर ठिय्या आंदोलन केले. पुढील दोन दिवसांत यासंदर्भात ठोस निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पालक व विद्यार्थ्यांनी दिला आहे.श्रीराम विद्यालयाने दोन वर्षांपूर्वी अतिरिक्त फीवाढ केली होती. या वेळी पालक संघटनेने दणका दिल्यांनतर शाळेने फीवाढ मागे घेतली होती. पण पुन्हा एकदा शाळेने सकाळच्या सत्रामध्ये भरणारी शाळा दुपारच्या सत्रात सुरू करणार असल्याचे जाहीर केले आहे. यासंदर्भात शाळा व्यवस्थापनाकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने संतप्त झालेल्या पालकांनी सोमवारी आंदोलन केले. शाळेत या वर्षीपासून इयत्ता १0 वीचे जादा वर्ग सुरू करण्यात आले आहेत. त्यानुसार सोमवारी सकाळी दहावीचे विद्यार्थी व शिक्षक शाळेच्या आवारात आले. पण शाळा व्यवस्थापनाने त्यांना आवारात प्रवेश दिला नाही. त्यामुळे सुमारे दीड तासाच्या प्रतीक्षेनंतर शिक्षक व विद्यार्थ्यांनी विनवणी केल्यामुळे त्यांना प्रवेश देण्यात आला. याप्रकाराने संतप्त झालेल्या पालकांनी व शिक्षकांनी शाळेसमोर ठिय्या आंदोलन करीत निषेध केला. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच रबाळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिदार यांनी घटनास्थळी येवून पालक व शाळा व्यवस्थापनांत चर्चा घडवून आणली. त्यामुळे पुढील दोन दिवसांत यासंदर्भात निर्णय घेवून पालकांना कळविण्याचे आश्वासन व्यवस्थापनाने दिल्यानंतर पालकांनी आपले आंदोलन मागे घेतले.