शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
2
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
3
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
4
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
5
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
7
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
8
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
9
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
10
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
11
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
12
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
13
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
14
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
15
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
16
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
17
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
18
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
19
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
20
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?

प्लास्टिकचा भस्मासुर थांबविण्याचे आव्हान, महानगरपालिकेच्यावतीने विविध मोहिमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 04:28 IST

- प्राची सोनवणे ।नवी मुंबई : प्लास्टिकमुक्त नवी मुंबई करण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने विविध मोहिमा राबविल्या जात आहेत. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी असतानाही शहरात अशा पिशव्यांची बिनधास्तपणे विक्री होत आहे. प्रदूषणाला कारणीभूत ठरणाºया प्लास्टिकच्या पिशव्यांच्या वापरावर बंदी घालण्यासाठी प्रशासन अपयशी ठरत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नागरिकच प्लास्टिक ...

- प्राची सोनवणे ।नवी मुंबई : प्लास्टिकमुक्त नवी मुंबई करण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने विविध मोहिमा राबविल्या जात आहेत. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी असतानाही शहरात अशा पिशव्यांची बिनधास्तपणे विक्री होत आहे. प्रदूषणाला कारणीभूत ठरणाºया प्लास्टिकच्या पिशव्यांच्या वापरावर बंदी घालण्यासाठी प्रशासन अपयशी ठरत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नागरिकच प्लास्टिक पिशव्यांसाठी भाजीविक्रेत्यांपासून दूधवाल्यांपर्यंत मागणी करत असून, पर्यावरणास घातक कचरा निर्माण करण्यास हातभार लावत आहेत. नागरिकांच्या उदासीनतेमुळे प्लास्टिकमुक्त नवी मुंबईबनविण्यात प्रशासनाला अपयश येऊ लागले आहे.नवी मुंबई परिसरात दिवसागणिक ९० टन प्लास्टिक कचºयाची निर्मिती होते. कचरा वर्गीकरणाविषयी मनपाची विशेष मोहीम राबविली जात असून, नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृतीही करण्यात आली आहे. मात्र, यामध्ये ओल्या कचºयातही प्लास्टिकचा समावेश असल्याने याचा परिणाम कचरा प्रक्रियेवर होत आहे. प्लास्टिकमुक्त शहरासाठी ठोस पाऊल उचलण्याची आवश्यकता असून, ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांची विक्री करणाºया, तसेच अशा पिशव्यांचा साठा ठेवणाºया व्यापाºयांवर कारवाईची वारंवार मागणी केली जात आहे. पर्यावरणास हानी करणाºया प्लास्टिक पिशव्यांचे निर्मुलन व्हावे, याकरिता महाराष्ट्र अविघटनशील घनकचरा नियमानुसार ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचे उत्पादन, वापर व विक्री करणाºया व्यापाºयांकडून पहिल्या गुन्ह्यास ५०००, दुसºया गुन्ह्यास १०,००० आणि तिसºया गुन्ह्यास २५,००० वसुली करण्यात येते. ५० मायक्र ॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या हा राज्यासह देशातील पर्यावरणाला सर्वात मोठा धोका आहे. कारण या जाडीचे प्लास्टिक नष्ट करणे कठीण जाते.व्यापाºयांवर ठोस कारवाईप्लास्टिक पिशव्यांची विक्री करणाºया व्यापाºयांवर कठोर कारवाई केली जावी. मोफत प्लास्टिकच्या पिशव्या ग्राहकांना दिल्या जात असल्याने बंदी असतानाही या पिशव्यांचा वापर होत असल्याचे निदर्शनास येते. अशा व्यावसायिकांकडून या पिशव्या जप्त करून कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. फेरीवाले, दूध डेअरी, औषधांचे दुकान, आदी व्यावसायिकांवर कारवाई करून कागदी पिशव्यांचा वापर करण्याचे आवाहन करणे गरजेचे आहे.महापालिकेची कारवाईआॅक्टोबर २०१६मध्ये सानपाडा येथील ११ व्यावसायिकांवर धडक कारवाई करून, ५५ हजार रुपयांची दंडात्मक वसुली करण्यात आली. २० वर्षांतील सर्वात मोठी कारवाई म्हणजे मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमिती परिसरामधील सात दुकानांवर धाड टाकून, तब्बल १३५५ किलो प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या. या व्यावसायिकांकडून ७० हजार रुपये दंडात्मक वसुली करण्यात आली असून, एक टनपेक्षा जास्त पिशव्या जप्त केल्या. मार्च २०१७मध्ये ऐरोली मुलुंड खाडीपुलापर्यंत दोन्ही बाजूला पडलेले प्लास्टिक संकलित करून या मोहिमेंतर्गत २४८ गोणी प्लास्टिक गोळा करण्यात आले. जुलैमध्ये बेलापूर परिसरात धाड टाकून २२०० किलो वजनाच्या प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या. या कारवार्इंतर्गत १०१ गोण्यांमध्ये प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त केला. आॅगस्ट महिन्यात एपीएमसी भाजीपाला मार्केटमधून १९५५ किलो प्लास्टिकच्या पिशव्या जप्त करून, दंडात्मक कारवाई करण्यात आली.प्लास्टिक बंदीमध्ये लोकसहभाग नाहीमहापालिकेने प्लास्टिकमुक्त नवी मुंबई मोहीम प्रभावीपणे राबविण्यास सुरुवात केली आहे; परंतु या मोहिमेमध्ये नागरिक मनापासून सहभागी होत नाहीत. नागरिकच ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांसाठी हट्ट करत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. नागरिकांच्या उदासीनतेमुळेच प्लास्टिकमुक्त शहराची मोहीम अपयशी ठरत आहे. नागरिकांनी प्लास्टिकचा वापर करू नये, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.नागरिकांचे योगदान हवेप्लास्टिकमुक्त शहर ही फक्त प्रशासनाची जबाबदारी नसून, नागरिकांनीही प्लास्टिकचा वापर टाळणे गरजेचे आहे. पर्यावरणाचा ºहास थांबविण्याकरिता नागरिकांनी स्वत: पुढाकार घेणे गरजेचे आहे. त्याजागी तागाच्या, कापडाच्या व कागदाच्या पिशव्यांचा वापर केला जात आहे. लोकांनी याला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आहे. मॉल, मोठी दुकाने आदी सारख्या अनेक ठिकाणी प्लास्टिक पिशवी हवी असल्यास वेगळी किंमत भरून घ्यावी लागते. यामुळे त्यांच्या वापराचे प्रमाण निश्चितच कमी झालेले आहे. ज्यांचे जैविक विघटन शक्य होते, अशा पिशव्यांचा वापर करणे आवश्यक असून, प्रत्येकाने प्लास्टिकचा वापर टाळण्याचे कर्तव्य चोखपणे बजाविणे आवश्यक आहे.

जगभरातील प्लास्टिक बंदीविषयी माहिती- बांगलादेशमध्ये २००२पासून प्लास्टिक पिशव्यांवर बंदी- डेन्मार्कमध्ये २००३पासून प्लास्टिक पिशव्यांवर रिटेलर्ससाठी कर- बेल्जियममध्ये २००७पासून प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर कर आकारला जात आहे.- चीनमध्ये २००८पासून प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी.- वेल्सममध्ये २०११पासून प्लास्टिक पिशव्यांवर शुल्क आकारण्यास सुरुवात- इटलीमध्ये २०११पासून प्लास्टिक बंदी- इंग्लंडमध्ये प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आहे.- अमेरिकेतही प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर निर्बंध आहेत.- मेक्सिकोत २०१०पासून दुकानदारांना प्लास्टिक पिशव्यांसाठी दंड आकारणी.प्लास्टिकमुक्ती काय करावे- दूध,भाजी व इतर वस्तू खरेदी करताना प्लास्टिक पिशव्यांचा आग्रह करू नये.- प्रवासाला जाताना प्लास्टिक ऐवजी घट्ट झाकण असलेली स्टेनलेस स्टीलची बाटली जवळ ठेवावी.- मार्केटमध्ये जाताना प्लास्टिक ऐवजी कापडी पिशवी बरोबर घेऊन जावी.- सरबत व थंड पेय पिण्यासाठी स्ट्रॉचा वापर करू नये.- मुलांना शाळेत मधल्या सुट्टीचा खाऊ प्लास्टिक ऐवजी स्टीलच्या डब्यात द्यावा.- फ्रोजन पदार्थ प्लास्टिकमध्ये पॅक केलेले असल्यामुळे त्यांचा वापर टाळावा.- घरात धान्य, मसाले, चहा, साखर ठेवण्यासाठी प्लास्टिक पिशव्यांचा वापर करू नये.सातारा पॅटर्न राबवावासातारा शहरामध्ये प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी केली जात आहे. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांचा वापर करणाºया दुकानदारांवर कडक कारवाई केली जात आहे. कारवाईमध्ये सातत्य ठेवल्यामुळे व पक्षपात केला नसल्याने बंदी असलेल्या पिशव्यांचा वापर थांबला आहे. प्लास्टिक पिशव्यांना पर्याय म्हणून कमी दरामध्ये कापडी व इतर पिशव्या सर्व दुकानांमध्ये उपलब्ध केल्यामुळे प्लास्टिकमुक्त सातारा मोहिमेला इतर शहरांच्या तुलनेमध्ये चांगले यश आले आहे.