शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

चाकरमानी मतदारांना थांबविण्याचे आव्हान

By admin | Updated: April 21, 2017 00:19 IST

पनवेल महानगरपालिकेची निवडणूक २४ मे रोजी घेण्याचे निवडणूक आयोगाने जाहीर करताच इच्छुक उमेदवारांची धावपळ सुरू झाली आहे

नितीन देशमुख , पनवेलपनवेल महानगरपालिकेची निवडणूक २४ मे रोजी घेण्याचे निवडणूक आयोगाने जाहीर करताच इच्छुक उमेदवारांची धावपळ सुरू झाली आहे. ऐन सुटीत निवडणूक जाहीर करण्यात आल्याने मतदान कमी झाले तर त्याचा फायदा कोणाला होईल, याची गणिते मांडण्यात येत आहेत. उन्हाळी सुटीसाठी गावी गेलेल्या मतदारांना कसे परत बोलवायचे, तसेच मे महिन्यात गावी जाणाऱ्या मतदारांना कसे थांबवायचे, यासाठी इच्छुकांकडून मतदारांची मनधरणी करण्यासाठी वेगवेगळे फंडे वापरण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. पनवेल महापालिका जाहीर झाल्यानंतर होणाऱ्या पहिल्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षाकडे अनेक इच्छुक उमेदवारांनी तिकीट मिळण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली होती. स्थानिक पक्ष प्रमुखांच्या उपस्थितीत विविध कार्यक्र म घेण्याची चढाओढ सहा महिने सुरू होती. सण उत्सवात आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, शैक्षणिक साहित्य वाटप आदी समाजोपयोगी उपक्रम सर्वत्र इच्छुकांनी राबवले. मात्र ज्या निवडणुकीची उमेदवार आतुरतेने वाट पहात होते ती पनवेल महापालिकेची निवडणूक ऐन सुटीत जाहीर झाली आहे. सध्या शाळा-महाविद्यालयांना सुटी लागल्याने चाकरमानी गावी रवाना झाले आहेत, तर काहींचे आगाऊ बुकिंग झाले आहे. त्यामुळे मतदारांना निवडणुकांमध्ये सहभागी करून घेण्यासाठी उमेदवारांकडून विविध शक्कल लढवल्या जात आहेत. प्रमुख राजकीय पक्षांनी तर प्रभागनिहाय सर्वेक्षण केल्याने मतदारांचे नाव, गाव, संपर्क क्रमांक मिळवला आहे.