शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
2
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
3
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
4
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
5
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
6
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
7
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
8
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
9
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
10
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
11
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
12
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
13
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
14
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
15
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
16
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
17
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
18
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
19
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
20
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल

शहरातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लावण्याचे आव्हान

By admin | Updated: April 19, 2016 02:38 IST

राज्य शासनाचे अत्यंत महत्त्वाचे महामंडळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकपदी भूषण गगराणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कमलाकर कांबळे, नवी मुंबई राज्य शासनाचे अत्यंत महत्त्वाचे महामंडळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकपदी भूषण गगराणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गगराणी यांनी गेल्या आठवड्यात पदभार स्वीकारला आहे. एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करताना गगराणी यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा व कार्यकुशल नेतृत्वाचा सिडकोला नक्कीच फायदा होईल, असा जाणकारांचा अंदाज आहे. असे असले तरी मागील तीन वर्षात कार्यरत झालेले अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लावण्याचे आव्हान गगराणी यांच्यासमोर असणार आहे. सिडको हे राज्य शासनाचे सर्वात श्रीमंत महामंडळ म्हणून ओळखले जाते. माजी व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी आपल्या तीन वर्षांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना चालना दिली. व्यवस्थापकीय संचालिका व्ही. राधा, मुख्य प्रशासक (नवीन शहरे) सुनील केंद्रेकर, मुख्य दक्षता अधिकारी डॉ. प्रज्ञा सरवदे या सकारात्मक विचारसरणीच्या अधिकाऱ्यांची मोट बांधून सिडकोच्या कारभारात आमूलाग्र बदल घडवून आणले. सध्या सिडकोच्या माध्यमातून प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो प्रकल्प, ३६ हजार कोटींचा स्मार्ट सिटी प्रकल्प, ६00 चौरस किमीचा नैना प्रकल्प, जेएनपीटी प्रभावित क्षेत्र आदी महत्त्वपूर्ण प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय विमानतळ हा राज्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या मार्गातील बहुतांशी अडचणी दूर झाल्या आहेत. परंतु भूसंपादनाच्या मोबदल्यावरून प्रकल्पग्रस्तांत नाराजी आहे. विमानतळबाधितांना प्रस्तावित पुष्पकनगरमध्ये साडेबावीस टक्के भूखंडांचे वाटप करण्यात येणार आहे. त्याची सोडतही काढण्यात आली. परंतु या भूखंडांचे प्रत्यक्ष वाटप कधी होणार याबाबत प्रकल्पग्रस्तांत साशंकता आहे. त्याचप्रमाणे जमिनीचे सपाटीकरण, उपऱ्या विद्युत वाहिन्या भूमिगत करणे, उलवे नदीचे पात्र बदलणे, प्रकल्पाला अडथळा निर्माण करणाऱ्या डोंगरांची उंची कमी करणे आदी प्राथमिक कामांना गती देण्याचे आव्हान गगराणी यांच्यासमोर असणार आहे.नैना क्षेत्राच्या विकासाचा पायलट प्रोजेक्ट राज्य शासनाकडे मंजुरीसाठी धूळखात पडून आहे. या प्रक्रियेला विलंब लागल्याने या परिसरातील विकासकामांना खीळ बसली आहे. त्यामुळे विकासकांत सिडकोबद्दत नाराजीचे सूर आहेत. या आघाडीवरही गगराणी यांना कसरत करावी लागणार आहे. मेट्रोचा पहिला टप्पा निर्धारित वेळेपेक्षा अधिक काळ रखडला आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा खर्चही वाढला आहे. त्याला गती देण्यासाठी जोरदार प्रयत्न गगराणी यांना करावे लागणार आहेत. बेकायदा बांधकामे ही सिडकोची डोकेदुखी ठरली आहे. विशेषत: प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेल्या बांधकामांचा प्रश्न कळीचा मुद्दा बनला आहे. त्यादृष्टीने सकारात्मक कार्यवाही करण्याची जबाबदारी आता गगराणी यांच्यावर येऊन ठेपली आहे. स्मार्ट दक्षिण नवी मुंबई प्रकल्पांतर्गत अनेक कामांना सुरुवात करण्यात आली आहे. ते पूर्णत्वास नेण्याचे काम गगराणी व त्यांच्या टीमला करावे लागणार आहे.