शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटीत वाहनतळ उभारण्याचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 02:41 IST

देशातील पहिली स्मार्ट सिटी होण्याचा दावा करणाऱ्या नवी मुंबईसह पनवेलमध्ये पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सिडकोने वाहनतळांसाठी पुरेसी जागा राखीव ठेवली नाही.

- सूर्यकांत वाघमारे, वैभव गायकरनवी मुंबई / पनवेल : देशातील पहिली स्मार्ट सिटी होण्याचा दावा करणाऱ्या नवी मुंबईसह पनवेलमध्ये पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सिडकोने वाहनतळांसाठी पुरेसी जागा राखीव ठेवली नाही. ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहतीमध्ये एकही वाहनतळ उभारण्यात आले नाही. परिणामी रोड व पदपथावर वाहने उभी करावी लागत आहेत. पार्किंग हीच दोन्ही महापालिकांसमोरील मुख्य समस्या बनली आहे.देशातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत म्हणून ठाणे-बेलापूर एमआयडीसीची ओळख आहे. हजारो ट्रक व कंटेनर या परिसरामध्ये येत असतात. परंतु अवजड वाहने उभी करण्यासाठी एकही वाहनतळ उभारण्यात आलेला नाही. एमआयडीसी प्रशासनाने भूखंड विक्री करून पैसे कमविण्यावर भर दिला आहे. पण येथे येणारी वाहने उभी करण्याची काहीही व्यवस्था केलेली नाही. परिणामी सर्व वाहने रोडवर उभी करावी लागत आहेत. शिरवणे व नेरूळ एमआयडीसीमध्ये तेल कंपन्यांचे टँकर रोडवरच उभे केले जात आहेत. रोडच्या दोन्ही बाजूला दोन्ही रांगेत अवजड वाहने उभी केली जात आहेत. हीच स्थिती मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरामध्ये आहे. सिडकोने एपीएमसीमध्ये एकमेव ट्रक टर्मिनल उभारले आहे. पण बाजार समितीमध्ये रोज ५ हजारपेक्षा जास्त वाहने येत असतात व ट्रक टर्मिनलमध्ये जास्तीत जास्त ५०० वाहने उभी राहू शकतात. जागाच नसल्याने सर्व वाहने एपीएमसी, मॅफ्को मार्केट, वाशी-तुर्भे रोड, पोलीस स्टेशन परिसरामध्ये उभी करावी लागत आहेत. तळोजा एमआयडीसी व कळंबोली स्टील मार्केटमध्येही अवजड वाहने उभी करण्यासाठी पुरेसी जागा नाही. परिणामी रोडवर अवजड वाहने उभी करावी लागत आहेत.नवी मुंबईमध्ये सद्यस्थितीमध्ये ३,९२,९८७ वाहने आहेत. पनवेलमध्ये ४ लाख २४ हजार ६०० वाहने आहेत. प्रत्येक वर्षी दोन्ही महापालिका क्षेत्रात जवळपास ७० ते ८० हजार वाहनांची नोंदणी होत आहे. वाहनांच्या वाढत्या संख्येच्या प्रमाणात वाहने उभी करण्यासाठी जागाच उपलब्ध नाही. परिणामी जिथे जागा मिळेल तिथे वाहने उभी केली जात आहेत. शहरातील प्रत्येक रोडवर दोन्ही बाजूला वाहने उभी केली जात आहेत. नो पार्किंगच्या बोर्डला लागूनच वाहने उभी करावी लागत आहे. प्रत्येक सोसायटीच्या बाहेर रोडवर वाहने उभी करावी लागत आहे. परिणामी मुख्य रोडवर सर्व्हिस रोडवरही वाहतूककोंडी होत आहे. पूर्वीच्या पनवेल नगर परिषद हद्दीत सर्वात गंभीर स्थिती आहे. वाहने उभी करायची कुठे असा प्रश्न नागरिकांना पडू लागला आहे. वाहतूक पोलीस सिडको व महापालिकांकडे वाहनतळ विकसित करण्यासाठी पाठपुरावा करत आहे. पण पोलिसांच्या सूचनांना केराची टोपली दाखविली जात असून पार्किंगवरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार असल्याचे मत जाणकार व्यक्त करत आहेत.पनवेलमधील पार्किंग समस्येची ठिकाणेतहसील कार्यालय, जुने भाजी मार्केट, लाइन आळी, पनवेल बाजार समिती, पनवेल रेल्वे स्टेशन व एसटी स्टँड, खांदा कॉलनी शिवाजी चौक, स्टील मार्केट कळंबोली, खारघर हिरानंदानी.नवी मुंबईतील महत्त्वाची ठिकाणेमुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती, वाशी, सानपाडा, नेरूळ रेल्वे स्टेशन, वाशी सेक्टर १७ ते कोपरखैरणे रोड, घणसोली सेक्टर ४ ते ५ रोड, घणसोली सिंप्लेक्स परिसर, कोपरखैरणे माथाडी वसाहत, सर्व गावठाण परिसर, ऐरोली सहकार बाजार मार्ग, सीवूड रेल्वे स्टेशन समोर.पोलिसांच्या सूचनांना केराची टोपलीपार्किंग समस्या सोडविण्यासाठी जास्तीत जास्त वाहनतळांची निर्मिती करावी. बहुमजली वाहनतळ उभारण्यात यावेत अशा सूचना वाहतूक पोलिसांनी वारंवार सिडको व महापालिका, एमआयडीसी प्रशासनाला केल्या आहेत. पार्किंगची समस्या असणाºया प्रत्येक ठिकाणासाठी काय उपाययोजना कराव्या यासाठी पत्रव्यवहार केले आहेत. परंतु सिडको, महापालिका व एमआयडीसी प्रशासन ही समस्या सोडविण्यासाठी गांभीर्याने लक्ष देत नाही.वाहनांचा प्रकार नवी मुंबई पनवेलदुचाकी १८९३६९ २१८३४६कार १०८४६३ १०२६५१जीप ४०७५ ४६७टॅक्सी २८४८ १६७टुरीस्ट कॅब १०४१५ ९७३७रिक्षा १८१३९ २१३६८स्टेज कॅरेजेस २६९ ९२मिनी बस ३६९१ ५४३स्कूल बस ८६२ १४५८प्रायव्हेट सर्व्हिस व्हेईकल ३६५ २४७रूग्णवाहिका ३११ ३४७आर्टीक्युलीटेड ४६५५ २३४०८ट्रक, लॉरी १६९४६ २९०८६टँकर ५०२८ २४९६डिलीव्हरी व्हॅन १८११७ १२११४टॅक्टर ६८ ३१२ट्रेलर ३५६० ८७इतर २४५ १६७४एकूण ३९२९८७ ४२४६००