शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

घणसोलीतील सेंट्रल पार्क रखडले

By admin | Updated: June 5, 2017 02:46 IST

महापालिकेतर्फे घणसोलीत सुरूअसलेले सेंट्रल पार्कचे काम प्रशासनाच्या अनास्थेमुळे रखडले आहे.

सूर्यकांत वाघमारे। लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : महापालिकेतर्फे घणसोलीत सुरूअसलेले सेंट्रल पार्कचे काम प्रशासनाच्या अनास्थेमुळे रखडले आहे. पहिल्या टप्प्याच्या कामाची मुदत संपली, तरीही पार्कचा आराखडा केवळ कागदावरच आहे. अनेक प्रकारांमुळे पार्कच्या आराखड्यात दोनदा झालेला असून अद्याप त्यावर आयुक्तांची स्वाक्षरी झालेली नाही.घणसोली सेक्टर-३ येथील सावली गाव हटवून महापालिकेने त्या ठिकाणी सेंट्रल पार्कचे काम हाती घेतले आहे; परंतु कामाला सुरुवात होऊन तीन वर्षे उलटूनही पार्क अद्यापही केवळ कागदावरच आहे. मुळात हा भूखंड पालिकेकडे हस्तांतर झालेला नसताना पालिकेने वर्कआॅर्डर काढली होती. अशातच सिडकोने भूखंडाचा काही भाग वगळून उर्वरित भूखंड पालिकेला हस्तांतरण करून घेण्याचे सुचवले; परंतु मूळ भूखंडाच्या क्षेत्रफळानुसार पार्कचा आराखडा करून कामाला सुरुवात झालेली असल्यामुळे वगळलेल्या भूखंडासह संपूर्ण भूखंड मिळावा, यासाठी पालिकेने सिडकोकडे अनेक प्रयत्न केले. याचदरम्यान पालिका आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची वर्णी लागल्यानंतर त्यांनीही यासाठी प्रयत्न केले. अखेर वर्कआॅर्डर काढल्यानंतर सुमारे दोन वर्षांनी घणसोली नोडसह सेंट्रल पार्कच्या भूखंडाचेही हस्तांतरण झाले. मात्र, या वेळी सिडकोने एकूण ४४ हजार १२४.९२ चौ.मी. क्षेत्रफळापैकी सुमारे ५८०० चौ.मी.चा भूखंड वगळूनच उर्वरित भूखंड महापालिकेला पार्कसाठी हस्तांतर केला. त्यामुळे पार्कच्या भूखंडाच्या क्षेत्रफळात झालेल्या बदलामुळे नवा आराखडा तयार करून नव्याने काम सुरू झाले होते. अशातच मुंढे यांनी प्रत्यक्ष पार्कच्या जागेची पाहणी करून काही बदल सुचवले होते. त्यांनी सुचवलेल्या बदलानुसार दुसऱ्यांदा पार्कचा आराखडा तयार करून तो मंजुरीसाठी पाठवण्यात आला. याच वेळी ‘वॉक विथ कमिशनर’ उपक्रमादरम्यान निश्चित मुदतीतच पार्कचे काम पूर्ण होईल, असे आश्वासन त्यांनी घणसोलीकरांना दिले होते; परंतु त्यांच्याकडून सुधारित आराखड्यावर निर्णय प्रलंबित असतानाच त्यांची बदली झाली. यानंतर नवे आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनीही त्याकडे लक्ष दिलेले नाही. यामुळे पार्कच्या आराखड्याचे घोंगडे चार महिन्यांपासून निर्णयाच्या प्रतीक्षेत भिजत पडले आहे. अशातच ३१ मे रोजी पार्कच्या पहिल्या टप्प्याच्या कामाची मुदत संपलेली आहे. प्रशासनाच्या अनास्थेमुळे मागील तीन वर्षांत त्या ठिकाणी फक्त प्रवेशद्वाराचे निम्याहून अधिक काम झाले आहे. त्याशिवाय जॉगिंग ट्रॅक व तलावाचे अर्धवट खोदकाम करण्यात आले आहे. यामुळे उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी ठेकेदाराला मुदतवाढ देण्याशिवाय प्रशासनाला गत्यंतर नाही. शिवाय खर्चाच्या रकमेतही वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर पार्कच्या कामाची सद्यस्थितीची गती पाहता ते पूर्ण होण्यास एक वर्षाचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.>ठळक घटनाक्रमसेंट्रल पार्कच्या नावाखाली सावली गाव हटवले. भूखंडाचे हस्तांतरण नसताही पालिकेने वर्कआॅर्डर काढली. गाव हटवल्यानंतर सहा वर्षांनी पार्कच्या कामाला सुरुवात. सिडकोने मूळ भूखंडाचा काही भाग वगळून केले हस्तांतरण. भूखंडाच्या क्षेत्रफळात बदल झाल्याने नवा आराखडा.आयुक्तांच्या स्वाक्षरीअभावी आराखडा कागदावरच.घणसोलीकर गेली १५ वर्षे उद्याने, मैदाने अशा मूलभूत सुविधांपासून वंचित राहिले आहेत. नोडचे हस्तांतरण झाले नसल्याच्या कारणावरून पालिका नोडकडे दुर्लक्ष करत होती. तर सिडकोने घणसोलीतील विकासकामे वाऱ्यावर सोडून इतर ठिकाणी लक्ष केंद्रित केले होते. यामुळे चांगली उद्याने, खेळाची मैदाने यापासून घणसोलीकर वंचित राहिले आहेत. सेंट्रल पार्कचे काम सुरू झाल्याने रहिवाशांना विरंगुळ्यासाठी चांगले उद्यान उपलब्ध होणार होते. मात्र, प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे पार्कचे काम रखडले असून ते पूर्ण होण्यास अजून एका वर्षाहून अधिक कालावधी लागण्याची शक्यता आहे.