शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

इलेक्ट्रिक बसेस खरेदीसाठी केंद्राची मंजुरी, ३0 बसेसचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 04:06 IST

महापालिकेच्या परिवहन उपक्रमात लवकरच इलेक्ट्रिक बसेसचा समावेश होणार आहे. केंद्राच्या अवजड उद्योग मंत्रालयाने फेम योजनेअंतर्गत ३0 बसेसना मंजुरी दिली आहे. खासदार राजन विचारे यांनी यासाठी केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.

नवी मुंबई : महापालिकेच्या परिवहन उपक्रमात लवकरच इलेक्ट्रिक बसेसचा समावेश होणार आहे. केंद्राच्या अवजड उद्योग मंत्रालयाने फेम योजनेअंतर्गत ३0 बसेसना मंजुरी दिली आहे. खासदार राजन विचारे यांनी यासाठी केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर त्यांच्या प्रयत्नाला यश आले असून, लवकरच या गाड्या एनएमएमटीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.माहिती व तंत्रज्ञानाचे शहर म्हणून नवी मुंबईची ओळख आहे. उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा असलेल्या या शहरात महापालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या माध्यमातून प्रवासी सेवा पुरविली जाते. ही सेवा अधिकाधिक लोकाभिमुख व्हावी, या दृष्टीने प्रशासनाचे प्रयत्न आहे. सध्या एनएमएमटीच्या ताफ्यातील वातानुकूलित बसेसला प्रवाशांची चांगली पसंती मिळत आहे. आता यात अत्याधुनिक दर्जाच्या इलेक्ट्रिक बसेसचा समावेश होणार आहे.या बसेससाठी ठाण्याचे खासदार राजन विचारे मागील चार वर्षांपासून प्रयत्नशील होते. केंद्र शासनाच्या संबंधित विभागाकडे २0१४ पासून त्यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू होता. मात्र, त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. यातच ३१ आॅक्टोबर २0१७ रोजी अवजड उद्योग मंत्रालयाने एक परिपत्रक काढून फेम योजनेअंतर्गत इलेक्ट्रिक बसेस खरेदीसाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार खासदार विचारे यांनी शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा यांच्यासमवेत महापालिकेचे आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांची भेट घेवून यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याची विनंती केली होती. महापालिका आयुक्तांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद देत तशा आशयाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला होता. परिवहन विभागाचे व्यवस्थापक शिरीष आरदवाड, परिवहन सदस्य विसाजी लोके, समीर बागवान, राजेंद्र आव्हाड आदींच्या समावेत राजन विचारे यांनी ६ जुलै २0१८ रोजी दिल्ली येथे अवजड उद्योग मंत्रालय विभागाचे सेक्रेटरी विश्वजीत सहाय यांची भेट घेवून इलेक्ट्रिक बसेसच्या प्रस्तावाचे सादरीकरण केले. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत अवजड उद्योग मंत्रालयाने फेम योजनेअंतर्गत नवी मुंबई महापालिकेला ३0 इलेक्ट्रिक बसेसची खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे. या बस खरेदीसाठी केंद्र शासनाकडून ६0 टक्के अनुदान मिळणार आहे, तर उर्वरित ४0 टक्के रक्कम महापालिकेला अदा करावी लागणार आहे. साधारण पुढील महिनाभरात या बसेस एनएमएमटीच्या ताफ्यात दाखल होतील, असा विश्वासराजन विचारे यांनी व्यक्त केला आहे.नागरिकांना दर्जेदार प्रवासी सेवा देण्याच्या उद्देशाने इलेक्ट्रिक बसेससाठी केंद्राकडे पाठपुरावा सुरू होता. या बसेसमुळे पर्यावरणाचा समतोल राखला जाणार आहे, तसेच इंधनाची बचत होणार आहे.- राजन विचारे,खासदार, ठाणे

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई