नवी मुंबई : लोकमत सखी मंचच्यावतीने विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे. वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात आज संध्याकाळी ५.३0 वाजता ‘सखी सन्मान’ हा सोहळा रंगणार आहे. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर अतिथींची उपस्थिती असणार आहे.महिला सक्षमीकरणात लोकमत समूहाचा नेहमीच पुढाकार राहिला आहे. विविध क्षेत्रातील ध्येयवेड्या व सेवाव्रती महिलांच्या कर्तृत्वाला सलाम करण्याच्या दृष्टीने ‘लोकमत सखी सन्मान’ पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यात सामाजिक, शौर्य, क्रीडा, आरोग्य, शैक्षणिक, व्यावसायिक-औद्योगिक, कला आणि साहित्य अशा विविध क्षेत्रातील महिलांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. शिवाय ‘लोकमत’ सखी मंचतर्फे ‘सन्मान जीवनगौरव’ पुरस्कार सुध्दा यावेळी देण्यात येणार आहे. ‘नटरंग’फेम सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची उपस्थिती या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण असणार आहे. शिवाय सुप्रसिद्ध गायक चिंतामण सोहणी यांची सांगीतिक मैफल आणि स्पार्क्स डान्स अॅकॅडमीचा नृत्याविष्कार प्रेक्षकांसाठी पर्वणीचा ठरणार आहे.तेरणा हॉस्पिटल हे या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आहे. हा कार्यक्रम विनामूल्य असून, कर्तृत्ववान महिलांच्या गुणगौरवाचे साक्षीदार होण्याबरोबरच त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अधिकाधिक महिलांनी उपस्थित राहावे, असे आवाहन लोकमत सखी मंचतर्फे करण्यातआले आहे.
वाशीत आज रंगणार ‘सखी सन्मान’चा सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 02:34 IST