शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
2
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
3
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
4
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
6
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
7
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
8
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
9
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
10
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
11
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
12
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
13
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
14
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
15
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
16
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
17
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
18
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
19
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
20
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...

जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 01:04 IST

नवी मुंबईत महिला पोलिसांतर्फे मोटारसायकल रॅली : वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचा संदेश

लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : महिला दिनाचे औचित्य साधून पोलिसांतर्फे मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सीबीडी येथील पोलीस मुख्यालयातून सुरू झालेल्या रॅलीची सांगता वाशीत करण्यात आली. याप्रसंगी महिला पोलिसांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचा संदेश दिला. महिला दिनाचे औचित्य साधून विशेष शाखेच्यावतीने हा  उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये महिला अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच कर्मचाऱ्यांना या रॅलीमध्ये सहभागी करून घेण्यात आले होते. त्यानुसार पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांच्या हस्ते रॅलीची सुरुवात करण्यात आली. यावेळी सहआयुक्त डॉ. जय जाधव, अपर आयुक्त डॉ. बी. जी. शेखर पाटील, उपायुक्त रूपाली अंबुरे, आदी उपस्थित होते. या रॅलीची सांगता वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात झाली. फलकाच्या माध्यमातून महिला पोलिसांनी वाहन चालकांना वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचा संदेश दिला. 

सोशल मीडियावर महिला दिन साजरानवी मुंबई : सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी भाषणबाजी न करता तळागाळातील कचरा वेचक महिला तसेच निराधार महिलांसाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या वृषाली मगदूम यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा महिलांसाठी सोमवारी कोविडच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन ‘आव्हानांची निवड’ या घोषवाक्याच्या माध्यमातून महिलांशी संपर्क साधून मार्गदर्शन केले. वृषाली मगदूम यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून महिला दिन कष्टकरी, शेतकरी, कामगार, कचरा वेचक, घरकाम करणाऱ्या महिलांपर्यंत पोहोचेल, त्यांना समता, समानता, आर्थिक स्थितीत‌ सुधार, निर्णयस्वातंत्र्य मिळावे, दारिद्र्य व‌ कौटुंबिक हिंसाचारातून सुटका व्हावी, हाताला काम व योग्य मोबदला मिळावा हीच महिला दिनानिमित्त मगदूम यांनी इच्छा व्यक्त केली.

पनवेलमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्क पनवेल : पनवेल महानगरपालिका, तहसील कार्यालय आदींसह सामाजिक संघटना व राजकीय पक्षांच्या माध्यमातून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध  कार्यक्रम आयोजित करून महिलांप्रति संवेदना व्यक्त करण्यात आल्या. 

पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून पनवेलमध्ये महिलांसाठी विशेष लसीकरण केंद्र उभारण्यात आले होते. तसेच पालिकेच्या वतीने महिला व बाल कल्याण विभागाच्या माध्यमातून तज्ज्ञ महिलांचे ऑनलाइन मार्गदर्शन शिबिर पार पडले. खारघर शहरातील मदरहुड हॉस्पिटलच्या वतीने महिला पोलिसांसाठी मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ सुरभी सिद्धार्थ यांनी महिला पोलिसांची तपासणी केली. कामाचे ठरावीक वेळापत्रक नसल्याने महिलांमध्ये विविध आजार जडण्याची  संभावना असल्याचे यावेळी तपासणीत निष्पन्न झाले. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासह  जास्तीत जास्त पाणी पिण्याचा सल्ला यावेळी डॉ सिद्धार्थ यांनी दिला. जेणेकरून महिला पोलिसांना भेडसावणारे मूत्रविकाराच्या आजारांवर नियंत्रण मिळविता येईल. ब्लू डार्ट या कंपनीच्या माध्यमातून भारतातील संपूर्ण महिलांनी संचलित असे केंद्र खारघर शहरात सुरू केले आहे. या केंद्रात सर्व महिला ब्लू डार्ट कंपनीचे व्यावसायिक काम पाहणार आहेत. श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व पनवेल मीडिया प्रेस क्लबच्या माध्यमातून माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाच्या औचित्यावर ७० महिलांना सन्मानित करण्यात आले. तहसील  कार्यालयात महिला दिन साजरा करण्यात आला. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई