पनवेल : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने नवीन पनवेल ओम अपार्टमेंट असोसिएशन येथे विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी महिलांसाठी लोकमत सखी मंचची नवीन सभासद नोंदणी करण्यात आली. तसेच आयुर्विमा पत्रक, महिलांना गृहोपयोगी भेटवस्तू देण्यात आल्या. या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आज महिला विविध क्षेत्रात अग्रेसर आहेत. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आज विविध कामे करीत आहेत. या वेळी महिलांच्या जीवनावर उपस्थितांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात नवीन पनवेलमधील जास्तीत जास्त महिलांनी ‘लोकमत सखी मंच’च्या नवीन सभासद नोंदणीचा लाभ घेतला. या नोंदणीसाठी महिलांमध्ये उत्साह असल्याचे या वेळी दिसून आले. या कार्यक्रमासाठी विजय म्हात्रे, संदीप पाटील, सुनील घरत, शिवानी घरत, मीरा म्हात्रे, मीनाक्षी पाटील, उषा तांडेल, कल्पना शेळखे, गुणाबाई म्हात्रे, सीमा ठाकूर, माया दरेकर, संध्या ठाकूर, उज्ज्वला पाचपांडे, शीला साखरे, पुष्पलता मढवी आदी महिला उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)
नवीन पनवेलमध्ये महिला दिन साजरा
By admin | Updated: March 9, 2017 02:47 IST