शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

सायबर सिटीच्या प्रवेशद्वारांवर सीसीटीव्ही वॉच

By admin | Updated: July 21, 2014 01:10 IST

वाढत्या गुन्हेगारी घटनांना आवर घालण्यासाठी पोलिसांनी शहराच्या प्रवेशद्वारांवर आपला तिसरा डोळा बसवला आहे

सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबईवाढत्या गुन्हेगारी घटनांना आवर घालण्यासाठी पोलिसांनी शहराच्या प्रवेशद्वारांवर आपला तिसरा डोळा बसवला आहे. अनेक गुन्ह्यांमध्ये शहराबाहेरील गुन्हेगारांचा हात दिसून आलेला आहे. त्यामुळे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामार्फत शहराच्या १५ प्रवेशद्वारांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.वाढत्या शहरीकरणाबरोबरच नवी मुंबईत गुन्हेगारी घटनांचे प्रमाणही वाढू लागले आहे. त्यामध्ये सोनसाखळी चोरी आणि घरफोडीच्या गुन्ह्यांचा अधिक समावेश आहे. त्यापैकी बहुतांश गुन्ह्यांची उकल नवी मुंबई पोलिसांकडून झालेली असून त्यातील गुन्हेगार हे शहराबाहेरील असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हद्दीबाहेर तपासामध्ये नवी मुंबई पोलिसांची डोकेदुखी वाढत आहे. गुन्हेगारांना पकडण्यासाठी दुसऱ्या पोलीस आयुक्तालय हद्दीत जाऊन कारवाई करतानाही तिथल्या विरोधाला पोलिसांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे नवी मुंबई शहराच्या प्रवेशद्वारांवरच पोलिसांनी पाळत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी परिमंडळ १ व २ मधील एकूण १५ प्रवेशद्वारांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. हे कॅमेरे तेथून रस्त्याने ये - जा करणाऱ्या वाहनांवर नजर ठेवणार आहेत. त्याद्वारे वाहनाच्या नंबर प्लेटवरील नंबरही पोलिसांना कळू शकणार आहे. त्यामुळे धूम स्टाईलने सोनसाखळी चोरी करुन शहराबाहेर पळ काढणाऱ्या चोरांचा मार्ग पोलिसांना कळणार आहे. प्रवेशद्वारांसह शहरातील इतरही मुख्य ठिकाणांवर सीसीटीव्ही कॅमेरे पोलिसांमार्फत बसवले जाणार आहेत. हे काम अंतिम टप्प्यात असल्याचे परिमंडळ १ चे पोलीस उपआयुक्त सुरेश मेंगडे यांनी सांगितले. यापूर्वी महापालिकेने पालिका क्षेत्रात २४८ सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत. त्याद्वारे काही गुन्ह्यांची उकल करण्यास पोलिसांना मदत झालेली आहे. परंतु शहराच्या प्रवेशद्वारांवर अशा कॅमेऱ्यांची कमतरता जाणवत होती. त्यामुळे शहराबाहेरील गुन्हेगारांना नवी मुंबईचे प्रवेशद्वार सदैव खुलेच होते. अखेर बाहेरून येणाऱ्या गुन्हेगारांवर नजर ठेवण्यासाठी पोलिसांनी हे पाऊल उचलले आहे. त्यामुळे महापालिकेसह पोलिसांच्याही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे तयार झाले आहे. त्याद्वारे संपूर्ण शहर हे पोलीस आयुक्तालयाच्या नजरेच्या टप्प्यात येणार असल्याचा विश्वासही उपआयुक्त मेंगडे यांनी व्यक्त केला. कॅमेरे बसवण्यासाठी पोलिसांनी स्थानिक समाजसेवक तसेच उद्योजक यांचे सहकार्य घेतले आहे. (प्रतिनिधी)