शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

CCTV चं जाळं, स्मार्ट पार्किंग अन् बरंच काही... तेही करवाढीशिवाय; नवी मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर

By नामदेव मोरे | Updated: February 17, 2023 14:07 IST

नवी मुंबई महानगर पालिका कर्जमुक्त महानगर पालिका ठरली आहे. सद्यस्थितीत मनपावर कोणतेही कर्ज नाही...

नवी मुंबई - नवी मुंबई महानगर पालिकेचा  2023-24 वर्षासाठी 4925 कोटी रूपयांचा अर्थसंकल्प आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सादर केला आहे. यावर्षीही  कोणतीच करवाढ करण्यात आलेली नाही. पुढील वर्षभरात उड्डाणपुलांचे जाळे निर्माण करणे, स्मार्ट पार्किंग योजनेवर भर दिला आहे. शहरसुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत.  आरोग्य, शिक्षण, पर्यावरण रक्षणावर भर देण्यात येणार आहे.

नवी मुंबईच्या सर्वांगीण विकासाचा वास्तववादी अर्थसंकल्प सादर करण्यात आला असल्याची माहिती आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिली. उत्पन्नात वाढ करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. उत्पन्नाचे स्रोत वाढविण्यात येणार आहेत.उत्पन्न वाढविण्यासाठी कराचा बोजा वाढविण्यात येणार नाही. दर्जेदार कामांवर भर देण्यात येणार आहे. सर्व कामांचे त्रयस्थ तटस्थ संस्थेकडून  परिक्षण केले जाणार आहे. शहरातील सर्व मालमत्तांचे लिडार सर्वेक्षण पूर्ण करून सर्व मालमत्ता कराच्या कक्षेत आणल्या जाणार आहेत.

नवी मुंबई महानगर पालिका कर्जमुक्त महानगर पालिका ठरली आहे. सद्यस्थितीत मनपावर कोणतेही कर्ज नाही.

अर्थसंकल्पातील महत्वाच्या योजना -- घणसोली, ऐरोली,वाशी, जुईनगर येथे नवीन उड्डाणपुल बांधणार. - शहरातील सर्व मालमत्तांचे लिडार सर्वेक्षण पूर्ण करण्यात येणार. - नेरूळमधील सायन्स पार्क चे काम पूर्ण करणार. - घणसोली, ऐरोली, सानपाडा, सीबीडीमध्ये क्रीडासंकुल उभारणार. - मोरबे धरणावर सौरउर्जा प्रकल्प सुरू करणार. - शहरात 1500 सीसीटीव्ही बसविण्यात येणार. - पदव्युत्तर पदवी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणार. 

नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाचा (एनएमएमटी) 536 कोटीचा अर्थसंकल्प -एनएमएमटी उपक्रमाचा 536 कोटी रूपयांचा अर्थसंकल्प तयार केला आहे. नवीन बस आगार उभारण्यात येणार आहेत. प्रवाशांना चांगल्या बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. 

नवी मुंबई महानगर पालिका उत्पन्नाची बाजू स्थानिक संस्था कर- 1626 कोटी -- मालमत्ता कर- 801 कोटी - विकास शुल्क- 360 कोटी - पाणी बील- 108 कोटी - परवाना व जाहिरात शुल्क- 10 कोटी - अतिक्रमण शुल्क-4 कोटी- मोरबे धरण व मलनिसःरण-41- रस्ते खोदाई शुल्क- 29 कोटी - आरोग्य शुल्क 14- शासन योजना-505- संकीर्ण जमा 279- आरंभीची शिल्लक 1145एकूण 4925 कोटी

खर्चाची बाजू -- नागरी सुविधा 1318- प्रशासकीय सुविधा 752- पाणीपुरवठा 568- उद्यान, मालमत्ता 556- ई गव्हर्नन्स 125- सामाजिक विकास 73- घनकचरा व्यवस्थापन 406- शासन योजना 1817- आरोग्य सेवा  225- परिवहन 274- आपत्ती निवारण 87- शासकीय परतावा 157- शिक्षण 184- अतिक्रमण 11एकूण 4922 कोटी

टॅग्स :Budgetअर्थसंकल्प 2023Navi Mumbaiनवी मुंबईNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका