शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

खारघरमधील सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित

By admin | Updated: August 9, 2016 02:33 IST

स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत सिडकोने आपल्या कार्यक्षेत्रात म्हणजेच दक्षिण नवी मुंबई परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे जाळे विणण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी मुंबई : स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत सिडकोने आपल्या कार्यक्षेत्रात म्हणजेच दक्षिण नवी मुंबई परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे जाळे विणण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात खारघर परिसरात १२४ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. हे कॅमेरे प्रत्यक्ष कार्यान्वित झाले असून त्याच्या नियंत्रण कक्षाचे सोमवारी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.दक्षिण नवी मुंबई क्षेत्रातील वाहतूक व्यवस्थापन, वाढत्या गुन्हेगाराला प्रतिबंध घालणे, एकूणच शहराची व शहरवासीयांची सर्वांगीण सुरक्षा राखण्याच्या दृष्टीने सिडकोने १0८ कोटी ६५ लाख रुपयांचा सीसीटीव्ही प्रकल्प हाती घेतला आहे. याअंतर्गत शहरातील प्रमुख व सार्वजनिक ठिकाणे, चौक, बाजारपेठा, बस डेपो, शाळा व महाविद्यालये आदी परिसरावर सीसीटीव्हीचा वॉच ठेवणार आहेत. खारघर, उरण, पनवेल, नवीन पनवेल, कामोठे, कळंबोली, उलवे आदी सिडको क्षेत्रात २0१९ पर्यंत एकूण ५७२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची योजना आहे. त्यापैकी १२४ कॅमेरे खारघरमध्ये बसविले आहेत. त्याचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत गगराणी यांनी सोमवारी केला. नवी मुंबई पोलीस विभागाच्या समन्वयाने हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पाचा एक भाग म्हणूनच सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय सिडकोने घेतल्याची माहिती गगराणी यांनी दिली. यामुळे सिडकोच्या प्रति असलेली विश्वासार्हता वाढेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी सिडकोच्या सह व्यवस्थापकीय संचालिका व्ही.राधा, राजेंद्र चव्हाण, मुख्य दक्षता अधिकारी विनय कारगांवकर, अतिरिक्त पोलीस आयुक्त मधुकर पांडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)