शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

जागावाटपाविषयी महाविकास आघाडीची सावध भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 00:17 IST

माजी मंत्री गणेश नाईक यांना घेरण्यासाठी नवी मुंबईमध्येही महाविकास आघाडी करण्याचा निर्णय शिवसेना, काँगे्रस व राष्ट्रवादीने घेतला आहे;

नवी मुंबई : माजी मंत्री गणेश नाईक यांना घेरण्यासाठी नवी मुंबईमध्येही महाविकास आघाडी करण्याचा निर्णय शिवसेना, काँगे्रस व राष्ट्रवादीने घेतला आहे; परंतु जागावाटपाचा कोणताही फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही. आघाडीमधील तीनही पक्षांनी स्वतंत्रपणे प्रभागनिहाय इच्छुक उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. जागावाटपाविषयी सुरू असलेल्या चर्चा, वृत्त व अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पदाधिकाऱ्यांना केले आहे.नवी मुंबई महानगरपालिकेची स्थापना झाल्यापासून येथे माजी मंत्री गणेश नाईक यांचे वर्चस्व आहे. येथील राजकारणामध्ये नाईक विरुद्ध सर्व असेच चित्र नेहमी पाहावयास मिळते. यापूर्वी लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये नाईकांना धक्का देण्यात विरोधकांना यश आले आहे; परंतु त्यांच्या ताब्यातून महापालिका हिसकावून घेणे अद्याप एकदाही शक्य झालेले नाही. या वेळी नाईक भारतीय जनता पक्षामध्ये असून, त्यांना शह देण्यासाठी येथेही महाविकास आघाडीचा प्रयोग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवसेना, काँगे्रस व राष्ट्रवादी एकत्रितपणे निवडणुकांना सामोरे जाणार आहेत.राष्ट्रवादीचे प्रभारी शशिकांत शिंदे, शिवसेना उपनेते विजय नाहटा, काँगे्रसचे जिल्हा अध्यक्ष अनिल कौशिक व इतर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन यापूर्वी प्राथमिक चर्चा केली आहे.महाविकास आघाडी निश्चित असली तरी अद्याप त्यासाठी अधिकृतपणे कोणतीही कोअर कमिटी स्थापन झालेली नाही. जागावाटप करण्यासाठीचा कोणताही निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. कोणता पक्ष किती जागांवर निवडणुका लढणार याविषयी अद्याप काहीही चर्चा महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये झालेली नाही.सद्यस्थितीमध्ये प्रत्येक पक्षाने पक्षाच्या इच्छुक उमेदवारांची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. महाविकास आघाडी झालीच तर कोणत्या प्रभागामध्ये आपल्या पक्षाकडे सक्षम उमेदवार आहे, याची माहिती घेतली जात आहे. प्रभागस्तरावरील कार्यकर्त्यांच्या बैठकाही घेतल्या जात आहेत. शुक्रवारी काँग्रेसने ब्लॉक कमिटीच्या पदाधिकाºयांची बैठक घेऊन पदाधिकाºयांशी चर्चा केली. माजी मंत्री गणेश नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे.राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रत्येक प्रभागामध्ये कार्यकर्त्यांची जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली आहे. समाजमाध्यमातून व प्रसारमाध्यमातून महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्याविषयी चर्चा सुरू झाली आहे. यामध्ये काहीही तथ्य नसल्याचे पक्षाच्या नेत्यांनी स्पष्ट केले आहे.महापालिका निवडणूक पूर्ण ताकदीने लढविण्यात येणार आहे. महाविकास आघाडी होण्यास काही अडचण नाही; परंतु याविषयी निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील. जागावाटपाविषयी कोणतीही चर्चा झालेली नसून पदाधिकाºयांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन सर्वांना केले आहे.- विजय नाहटा,उपनेते, शिवसेना