नवी मुंबई : टेस्ट ड्राइव्हच्या बहाण्याने शोरूममधून मर्सिडीज बेन्झ कार पळवल्याचा प्रकार वाशीत घडला. शोरूमच्या कामगारांना हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी बसवून कार पळवण्यात आली. एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.कार खरेदीच्या बहाण्याने वाशी सेक्टर १९ मधील शोरूममध्ये आलेल्या विराज म्हात्रेने ३४ लाख ५० हजार रुपयांची कार पळवून नेली आहे. तो विरारचा असल्याचे त्याने सांगितले होते. त्याने सीएल २०० सीडीआय स्पोर्ट्स कार टेस्ट ड्राईव्हसाठी नेली. वेदासू राऊत हा शोरूमचा कर्मचारी देखील त्याच्यासोबत होता. रंगोली हॉटेलमध्ये वेदासूला बसवून कागदपत्रे तयार करण्यास सांगितले आणि विराज बाहेर गेला. थोड्या वेळाने वेदासू याने हॉटेलबाहेर जाऊन पाहिले असता तो कार घेऊन पळाल्याचे दिसले.
टेस्ट ड्राइव्हची कार पळवली
By admin | Updated: July 6, 2015 06:03 IST