शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

रोहा बाजारपेठेत कारने १० जणांना उडविले

By admin | Updated: February 6, 2017 04:47 IST

रोह्यात नागोठणेकडून कार चोरून नेत असताना चालकाने रोह्यातील बाजारपेठेत मोटरसायकलसह १० पादचाऱ्यांना उडविले.

धाटाव : रोह्यात नागोठणेकडून कार चोरून नेत असताना चालकाने रोह्यातील बाजारपेठेत मोटरसायकलसह १० पादचाऱ्यांना उडविले. या भयानक अपघातात सर्वांनाच गंभीर दुखापत झाल्यामुळे संतप्त जमावाने या कार चालकाला चोप दिला. चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दुर्घटनेमुळे सबंध रोह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.शनिवारी ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७.२५ च्या सुमारास कमलेश गंगू प्रजापती(२३,रा.जैनबस्ती, जि. उदयपूर, राजस्थान) हा एम.एच.४६ए.डी.२५८२ क्र मांकाची कार चोरी करून नागोठणे,भिसे खिंडीमार्गे रोह्याकडे येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावेळी पोलिसांनी थांबविण्याचा इशारा केला. मात्र याकडे दुर्लक्ष करून तो कार भर बाजारातून अधिक भरधाव वेगाने रस्त्यावरील रहदारीकडेही दुर्लक्ष करीत जात होता. यावेळी फिर्यादी अमोल तुकाराम घाडगे (३५) यांच्या मोटारसायकलला ठोकर मारून व रस्त्यावरील इतर मोटारसायकल व १० पादचाऱ्यांना जोरदार धडक देत दुखापत के ली. अपघातातील जखमींमध्ये भूषण दिलीप म्हात्रे, प्रसाद रामचंद्र मेकडे (रा. भुवनेश्वर,रोहा), अंजना नरेश मोरे, सतीश गोविंद देशमुख (रा. विष्णूनगर), रश्मी राजेश वाघमारे (रा. परमारनगर-रोहा), विजय शांताराम कासार, ओम राजेंद्र कासार (७),साईशा राजेंद्र कासार (२, रा.खारापटी), ज्ञानेश्वर मारु ती सानप (गावठाण), चौहान व स्वत: आरोपी कमलेश प्रजापती सुद्धा जखमी झाला आहे. जखमींवर रोह्यातील उपजिल्हा रु ग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताची रोहा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून रोह्याच्या पोलीस निरीक्षक निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार म्हात्रे व सहकारी अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)