उल्हासनगर : वजनकाटय़ात जाणीवपूर्वक फेरबदल करून नागरिकांना गंडविणा:या शिधावाटप दुकानदारांचा परवाना रद्द करण्याची मागणी मनसेने केली आहे. वजनकाटय़ात बनावटगिरी करणा:या दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करून कमी दिलेले धान्य ग्राहकांना परत करण्याचा इशाराही दिला आहे.
उल्हासनगरातील शिधावाटप दुकानदारांनी वजनकाटय़ात फेरबदल केल्याप्रकरणी त्यांच्यावर वजनमापे विभागाने दंडात्मक कारवाई केली आहे. गरीब-गरजू नागरिकांना गंडवणा:या शिधावाटप दुकानदारांवर दंडात्मक कारवाईपेक्षा त्यांचा परवाना रद्द करून कमी दिलेले धान्य नागरिकांना परत करण्याची मागणी मनसेचे जिल्हा संघटक बंडू देशमुख यांनी केली आहे. शिधावाटप कार्यालयाने दुकानदारांवर सक्त कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिल्याने शिधावाटप दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत.
शहर मनसेने शिधावाटप दुकानदार वजनकाटय़ात फेरबदल करून नागरिकांना कसे फसवितात, याची जनजागृती सुरू केली आहे. या प्रकाराने नागरिकांत असंतोष निर्माण होऊन शिधावाटप दुकानांतील वजनकाटे तपासण्याची मागणी होत आहे. नोव्हेंबर महिन्यात 16 शिधावाटप दुकानदारांचे वजनकाटे दोषी आढळल्याने वजनमापे कार्यालयाने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे. यापूर्वी 11 शिधावाटप दुकानांवर कारवाई केल्याची माहिती वजनमापे वैधमापनशास्त्र विभागाचे निरीक्षक मधुकर कोचरे यांनी दिली. शहरात शिधापत्रिकाधारक नागरिकांची संख्या 2 लाखांपेक्षा जास्त असून लाखो किलो अन्नधान्याचा अपहार केल्याची टीका होत आहे. अशा दुकानांवर कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्री, शिधावाटप विभागासह पोलिसांना निवेदन देणार असल्याची प्रतिक्रिया मनसेचे बंडू देशमुख यांनी दिली आहे. या प्रकाराने सामान्य नागरिकांत असंतोष निर्माण झाला असून शिधावाटप दुकानांतील वजनकाटय़ांची लवकरच तपासणी होणार आहे.
4गरीब-गरजू नागरिकांना गंडवणा:या शिधावाटप दुकानदारांवर दंडात्मक कारवाईपेक्षा त्यांचा परवाना रद्द करून त्यांनी आजवर जेवढे धान्य कमी दिले ते नागरिकांना देण्याची मागणी मनसेचे जिल्हा संघटक बंडू देशमुख यांनी केली आहे.
4शिधावाटप कार्यालयाने दुकानदारांवर सक्त कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशाराही देशमुख यांनी दिल्याने शिधावाटप दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत.
वजनकाटय़ात दोष आढळल्यास ते दुरुस्त करून घेण्याची जबाबदारी दुकानदाराची आहे. वजनकाटय़ांची तपासणी केली असता दोषी 16 दुकानदारांविरोधात कारवाई केली .
- मधुकर कोचरे, निरीक्षक वजनमापे वैधमापनशास्त्र कार्यालय