शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

शुद्ध पाण्यासाठी मोहीम

By admin | Updated: June 3, 2016 02:03 IST

अंगणवाड्यांमधील बालकांना स्वच्छ व शुध्द पाणी मिळावे यासाठी तेथील पिण्याच्या पाण्याची रासायनिक व जैविक तपासणी करण्यात येणार आहे.

आविष्कार देसाई,  अलिबागअंगणवाड्यांमधील बालकांना स्वच्छ व शुध्द पाणी मिळावे यासाठी तेथील पिण्याच्या पाण्याची रासायनिक व जैविक तपासणी करण्यात येणार आहे. त्यामुळे अंगणवाडीतील बालकांना शुध्द पाणी मिळते की नाही हे समोर येणार आहे. तीन हजार २८३ अंगणवाड्यांमधील पिण्याच्या पाण्याचे नमुने ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागामार्फत उपविभागीय प्रगोगशाळेत पाठविण्याच्या सूचना पाणी व स्वच्छता विभागाने दिल्या आहेत. शुध्द पाणीपुरवठ्याबाबत रायगड जिल्हा परिषदेने मोहीम सुरू के ली असल्याचे बोलले जात आहे.सध्या पाण्याचे दुर्भिक्ष आहे. त्यामुळे मिळेल त्या स्रोतातून पाणी घेतले जात आहे. हे स्रोत शुध्द आहेत की अशुध्द याची माहिती नागरिकांना नसते. त्यामुळे तेथे साथीच्या रोगांचा धोका संभवतो. तेथील ही पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे परीक्षण करण्याच्या सूचना आधीच दिल्या आहेत. जिल्ह्यातील असणाऱ्या स्रोतांची वेळोवेळी शुध्दता तपासणे गरजेचे आहे. काही दिवसांनी पावसाळा सुरु होणार आहे. शाळा, अंगणवाड्या सुरु होतील. जिल्ह्यामध्ये तीन हजार २८३ अंगणवाड्या आहेत. या अंगणवाड्यांमध्ये एक लाख ६० हजार ३८१ शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालके आहेत. यासाठी तेथील अंगणवाड्यांना पिण्याच्या शुध्द पाण्याचा पुरवठा होणे गरजेचे आहे. अशुध्द पाण्यामुळे तेथील बालकांना साथीचे आजार होऊ नयेत यासाठी दक्षता घेण्यात येत आहे.अंगणवाडी परिसरातील पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची रासायनिक आणि जैविक तपासणी करण्यात येत आहे. आरोग्य विभागासह ग्रामपंचायतींचा यामध्ये महत्त्वाचा सहभाग असल्याचे पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्यकारी अधिकारी पुंडलिक साळुंखे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. तालुकाअंगणवाड्या विद्यार्थीअलिबाग२७३१२,८३१कर्जत-११६६८,८२७कर्जत-२१६९९,६८८खालापूर२०३१०,८१५महाड३१८१०,०४९माणगाव३४२११,०४७तळा११३२,५३२म्हसळा१२८३,४४१मुरुड११३४,८३५---------तालुकाअंगणवाड्या विद्यार्थीपनवेल११८२१७,६९९पनवेल२१८२१७,८२५पेण२९८१३,५९९रोहे२५३११,०७४पोलादपूर१२७३,१६४श्रीवर्धन१३६५,७७८सुधागड१५७५,९९०उरण१२३११,१८७एकूण३,२८३१,६०,३८१