शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाळा अभयारण्यातील वन्यप्राण्यांची गणना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 00:01 IST

संडे अँकर । दरवर्षी बुद्ध पौर्णिमेला मोहीम; वन्यजीव विभागामार्फत सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित

- वैभव गायकर।पनवेल : कर्नाळा अभयारण्यातील पक्षी, प्राण्यांची गणना करण्यासाठी वन्यजीव विभागामार्फत शनिवारी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी अभयारण्यातील विविध भागात ट्रॅक कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. दरवर्षी बुद्ध पौर्णिमेला वन्यजीव विभागामार्फत पक्षी-प्राण्यांची गणना करण्यासाठी हा उपक्र म राबवला जातो.

नवी मुंबई, पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात सिमेंटचे जंगल उभे राहत आहे, त्यामुळे पनवेलपासून अवघ्या काही कि.मी. अंतरावर असलेल्या कर्नाळा अभयारण्याला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी भेट देत असतात. मागील वर्षी सुमारे ८८ हजार पर्यटकांनी या अभयारण्याला भेट दिली होती. सुमारे १२.१५५ चौरस किलोमीटरच्या परिसरात हे अभयारण्य वसले आहे. स्थानिक तसेच स्थलांतरित १४७ प्रजातीचे पक्षी या ठिकाणी आहेत. यामध्ये ३७ प्रकारचे पक्षी हे स्थलांतरित पक्षी आहेत. विविध प्रकारच्या हिंस्र प्राण्यांचाही या ठिकाणी अधिवास आहे. या प्राण्यांच्या सध्याची स्थिती माहिती करण्यासाठी वन्यजीव विभागामार्फत चार ठिकाणी ट्रॅक कॅमेरे लावण्यात आले आहेत. शनिवारी सकाळी ७ वाजल्यापासून रविवारी सकाळी ७ वाजेपर्यंत हे कॅमेरे कार्यरत राहणार आहेत. सध्याची वातावरणातील परिस्थिती तसेच वाढता उकाडा पाहता, पाणथळ्या शेजारी हे कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. या ट्रॅक कॅमेऱ्यामध्ये एक चीप बसविण्यात आल्याने प्राण्यांची हालचाल झाल्यास त्यांचे छायाचित्रच या कॅमेºयात कैद होणार आहेत. प्राण्याच्या पायांचे ठसेही हा कॅमेरा टिपणार आहे.

२४ तास कार्यान्वित असणाºया या कॅमेऱ्यांच्या निगराणीची जबाबदारी एक वनरक्षक व दोन वनमजुरांवर देण्यात आली आहे. कॅमेºयातील चीपमध्ये कैद झालेल्या छायाचित्राच्या आधारे नव्याने प्राणी व पक्ष्यांची गणना केली जाणार आहे. या कॅमेºयात कैद झालेल्या माहितीच्या आधारे लवकरच अभयारण्यात कोणकोणत्या पक्ष्यांचा व प्राण्याचा वावर आहे, याची सविस्तर माहिती या मोहिमेद्वारे समोर येणार आहे.या प्राण्यांचा समावेशकर्नाळा उभारण्यात बिबटे, बेकर, रानडुक्कर, साळींदर, रानमांजर, ससा आदी दुर्मीळ प्राणी या ठिकाणी आढळतात, तर पक्ष्यांमध्ये मध्य आशिया, युरोप, उजबेकिस्तान, सैबेरियामधून पक्षी या ठिकाणी स्थलांतरित होत असतात. यामध्ये मलबार, व्हिसलिंग थ्रश, कोकीळ, फ्लाय कॅचर, भोरड्या, तांबट, कोतवाल, पांढºया पाठीची गिधाडे, दयाळ, शाहीन ससाणा, टिटवी व विविध प्रजातीचा समावेश आहे.या ठिकाणी लावले आहेत ट्रॅक कॅमेरेकर्नाळा अभयारण्य माहिती केंद्राच्या मागील बाजूस, अभयारण्यातील मयूर तलाव, कमळ तलाव व घेरावाडी आदिवासी वाडीनजीक हे कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. या परिसरात मोठ्या प्रमाणात वन्यजीवांचा राबता असल्याने ही ठिकाणे प्राण्यांची गणना करण्यासाठी निवडली असल्याची माहिती कर्नाळा अभयारण्यातील वनपरिक्षेत्र अधिकारी पी. पी. चव्हाण यांनी दिली.बौद्ध पौर्णिमेला वन्यजीव गणना का?वैशाख शुक्ल पौर्णिमा म्हणजेच बुद्ध पौर्णिमा ही उन्हाळ्याच्या दिवसातील सर्वाधिक प्रकाशमय रात्र असते. वैशाख महिन्यात उन्हाच्या झळा तीव्र असतात, यामुळे पाणथळ्यावर हमखास प्राणी येत असतात २४ तासांमध्ये त्यांची गणना केली जाते. रात्री किमान एकदा तरी प्राणी पाणथळ्यावर येतोच. वनविभागाचे अधिकारी याकडे बारकाईने लक्ष ठेवून असतात.