शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
4
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
5
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
6
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
7
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
8
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
9
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
10
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
11
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
12
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
13
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
14
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
15
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
16
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
17
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
18
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
19
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
20
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!

वाघिवलीच्या सावकारावर सिडकोचाही वरदहस्त

By admin | Updated: August 10, 2016 03:30 IST

वाघिवलीमधील शेतकऱ्यांच्या फसवणुकीला सिडकोचा निष्काळजीपणाही जबाबदार असल्याचा आरोप पीडित प्रकल्पग्रस्तांनी केला आहे.

नवी मुंबई : वाघिवलीमधील शेतकऱ्यांच्या फसवणुकीला सिडकोचा निष्काळजीपणाही जबाबदार असल्याचा आरोप पीडित प्रकल्पग्रस्तांनी केला आहे. मार्च २००० मध्ये भूसंपादन केल्यानंतर २००४ मध्ये तत्काळ साडेबारा टक्के योजनेच्या भूखंड वितरणास सुरवात केली. १९९५ पासूनची शेकडो प्रकरणे प्रलंबित असताना वाघिवलीचे भूखंड तत्काळ का दिले असा प्रश्न उपस्थित होत आहे. याशिवाय रायगड जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांना ठाणे जिल्ह्यात भूखंड वाटप करण्यात आल्याने या प्रक्रियेवरच शंका उपस्थित केली जात आहे. शासनाने जमीन घेवून मोबदला दिला नाही. महसूल अधिकाऱ्यांनी कुळांची नावे कमी केली व सिडकोने स्वत:ची जमीन स्वत: न कसणाऱ्या (अ‍ॅबसेंटी लँड लॉर्ड) सावकार कंपनीच्या वारसदारांना साडेबारा टक्केचे भूखंड वितरीत केले. सर्वच यंत्रणांनी केलेल्या अन्यायामुळे न्याय मागायचा कोणाकडे असा प्रश्न वाघिवलीमधील ग्रामस्थ विचारू लागले आहेत. एक रूपया न देता सर्व जमीन घेतली व साडेबारा टक्के योजनेचा लाभही परस्पर दुसऱ्यांना दिल्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड मोठा धक्का बसला आहे. गावातील नागरिकांनी याविषयी माहिती देताना सांगितले की, राधाकिशन लालचंद ठाणे दुकान ही कंपनी आमच्या कुळांची प्रमुख होती. १९२९ पासून आम्ही जमीन कसत आहोत. तीन पिढ्या ज्या जमिनीवर भात, भाजीपाला पिकवत होतो. त्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावरून नावे कमी केली. १९७० मध्ये जमीन संपादनाची प्रक्रिया केली असताना १९९९ मध्ये संपादन रद्द करण्यात आले. कंपनीच्या ऐवजी त्यांच्या वारसदारांची नावे सातबारा उताऱ्यावर लावल्यानंतर लगेच पुन्हा तीच जमीन संपादित केली. जमीन संपादन केल्यानंतर चार वर्षात मुंदडा यांना साडेबारा टक्के योजनेअंतर्गत पहिला २७०० चौरस मीटरचा भूखंड खारघरमध्ये देण्यात आला. यानंतर बेलापूर सेक्टर ३० व ३१ मध्ये ४०९०० चौरस मीटरचे भूखंड देण्यात आले. आतापर्यंत संबंधितांना ५३२०० चौरस मीटर भूखंडांचे वितरण केले आहे. वास्तविक स्वत: जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांनाच साडेबारा टक्के योजनेचा लाभ दिला जातो. नियमात स्पष्ट तरतूद असताना मुंदडा कुटुंबीयांना भूखंडांचे वाटप केलेच कसे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (प्रतिनिधी)