शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाळा अभयारण्यात बटरफ्लाय गार्डन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 02:40 IST

पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी वनविभागाने राज्य पर्यटन महामंडळाच्या माध्यमातून कर्नाळा अभयारण्यात बटरफ्लाय गार्डन ही नावीन्यपूर्ण संकल्पना राबविली आहे.

वैभव गायकर पनवेल : पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी वनविभागाने राज्य पर्यटन महामंडळाच्या माध्यमातून कर्नाळा अभयारण्यात बटरफ्लाय गार्डन ही नावीन्यपूर्ण संकल्पना राबविली आहे. फुलपाखरांना पोषक असे वातावरण निर्माण करून या गार्डनमध्ये विविध प्रकारची झाडे देखील लावण्यात आली आहेत. हा संपूर्ण प्रकल्प उभारण्यासाठी ५ लाख रुपयांचा खर्च येणार आहे. लवकरच पर्यटकांना या बटरफ्लाय गार्डनमध्ये फुलपाखरांसोबत खेळण्याची संधी मिळणार आहे.कर्नाळा अभयारण्य हे पक्षिप्रेमींसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. याठिकाणी देशी व विदेशी प्रजातीचे अनेक पक्षी आहेत. यामध्ये रानखाटिक, ठिपकेवाला सातभाई, कस्तूर, शिंपी, गिधाड, सुरेल, खाचू कवटा, राखी धोबी, भारतव्दाज, शामा, मोर, फुलटोचा, पावशा, कापशी घार, नीळकंठ पोपट, सूर्यपक्षी, हरियल यासारखे सुमारे १३४ प्रजातीचे स्थानिक तर ३८ प्रजातीचे स्थलांतरीय पक्षी आहेत. त्यामुळे पक्षिप्रेमींसाठी याठिकाणी एक पर्वणीच असते. याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना नावीन्यपूर्ण पर्वणी देण्याच्या उद्देशाने वनपरिक्षेत्र अधिकारी पी.पी. चव्हाण यांनी बटरफ्लाय गार्डन ही संकल्पना याठिकाणी राबवली आहे. पाच लाख रुपये निधी खर्च करून याठिकाणी १० बाय २० स्केअर मीटर परिसरात हे गार्डन उभारण्यात येत आहे. याअंतर्गत अडीच लाख रुपये खर्च करून गार्डनचे स्ट्रक्चर तयार करण्यात आले आहे, तर उर्वरित अडीच लाख रुपये खर्चून विविध प्रकारची झाडे लावण्यात येत आहे. यामुळे फुलपाखरे आकर्षित होणार आहेत. याठिकाणी १०० पेक्षा जास्त फुलपाखरांची रेलचेल असते त्यामुळे बच्चे कंपनीसाठी हे गार्डन आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. विशेष म्हणजे पनवेलसह परिसरात मोठ्या प्रमाणात सिमेंटचे जंगल उभे राहत आहे. लहान मुलांसाठी फुलपाखरे नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असल्याने याठिकाणी नजीकच्या काळात शाळेच्या सहली वाढणार आहेत. तसेच निसर्गप्रेमी, पक्षिमित्र आदी देखील मोठ्या प्रमाणात याठिकाणी येणार आहेत. विशेष म्हणजे याठिकाणी ओपन जीम देखील उभारण्यात येत असल्याने हे गार्डन आबालवृध्दांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू असेल.>पर्यटकांची संख्या वाढावी, स्थानिकांचा रोजगार वाढावा या सर्व गोष्टीचा विचार करून हे गार्डन उभारण्यात येत आहे. याकरिता महाराष्ट्र पर्यटन महामंडळाला प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर याठिकाणी कामाला सुरुवात झाली. या गार्डनमुळे नक्कीच पर्यटकांच्या संख्येत वाढ होणार आहे.- पी. पी. चव्हाण,वनपरिक्षेत्र अधिकारी,कर्नाळा अभयारण्य