शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

घरफोडीने सीबीडी परिसर हादरला; ३० तोळे दागिने पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 00:17 IST

१ लाख ६० हजार रुपयांची रोकड लंपास

नवी मुंबई : रविवारी रात्री घरफोडीने सीबीडी परिसर हादरला. सेक्टर ३ मधील एक घरातून जवळपास ३० तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व १ लाख ६० हजार रुपये रोख रक्कम पळवून नेण्यात आली. जवळपास ९ लाख रुपये किमतीचे दागिने पळवून नेण्यात आले आहेत.नवी मुंबईमध्ये चोरी व घरफोडीच्या घटना पुन्हा वाढू लागल्या आहेत. बंद घराचे कडी कोयंडे तोडून चोरटे आतमधील दागिने व किमती वस्तू घेऊन पळ काढत आहेत. सीबीडी सेक्टर ३ मधील बी १० टाइप इमारतीमध्ये राहणाऱ्या गजानन भंडारे यांच्या घरातही रविवारी चोरीची घटना घडली. वडिलांची प्रकृती व्यवस्थित नसल्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्य कामोठे येथे गेले होते. सोमवारी सकाळी तेथून सीबीडीला परत आल्यानंतर, दरवाजाचे टाळे तुटले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घरात जाऊन पाहिले असता, सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडले होते. कपाटातील दोन मंगळसूत्र, दोन बांगड्या, सोनसाखळ्या, अंगठ्या, सोन्याचे हार, कर्णफुले असे जवळपास ३० तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी पळवून नेले आहेत. घरात ठेवलेली १ लाख ६० हजार रुपयांची रोख रक्कमही चोरीला गेली आहे.या प्रकरणी भंडारे यांनी तत्काळ सीबीडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.युद्धपातळीवर तपास व्हावा : एकाच घरातून जवळपास ३० तोळे सोने व रोख रक्कम चोरीला गेल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या गुन्ह्याचा यद्धपातळीवर तपास करून आरोपींना गजाआड करावे. आरोपींना लवकर पकडल्यास परिसरातील नागरिकांमधील भीतीचे वातावरण कमी होईल, अशी प्रतिक्रिया रहिवाशांनी व्यक्त केली आहे. परिसरातील सीसीटीव्हीही तपासण्यात यावेत, अशी मागणीही केली आहे.