शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

उन्हाळ्याच्या सुटीमध्ये घरफोडीचे सत्र

By admin | Updated: May 12, 2017 01:56 IST

नागरिक उन्हाळ्याच्या सुटीमध्ये गावी गेले असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी शहरात धुमाकूळ घातला आहे. एकाच दिवशी तीन

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : नागरिक उन्हाळ्याच्या सुटीमध्ये गावी गेले असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी शहरात धुमाकूळ घातला आहे. एकाच दिवशी तीन ठिकाणी घरफोडी झाली असून रोख रकमेसह ३ लाख ५७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. सीबीडी सेक्टर ८ मधील रो हाऊसमध्ये राहणारे व्यावसायिक भगवानभाई मौवलीया नातेवाइकाच्या लग्नासाठी ७ मे रोजी गुजरातला गेले होते. लग्नावरून परत आल्यानंतर त्यांना घरात चोरी झाली असल्याचे निदर्शनास आले. चोरट्यांनी खिडकीचे ग्रील तोडून आतमधील ५९ हजार ५०० रुपये किमतीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली आहे. पनवेल सेक्टर ४ करंजाडे येथे नीळकंठ कृपा इमारतीमध्ये राहणाऱ्या मुकेश पाठक यांच्या घरामध्ये कोणी नसताना चोरट्यांनी बंद दरवाजाचा कडी कोयंडा तोडून आतमधील २ लाख ४१ हजार रुपये किमतीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली आहे. ८ ते १० मे दरम्यान ही घटना घडली आहे. पाठक कुटुंबातील सदस्य बुधवारी घरी आल्यानंतर त्यांच्या ही गोष्ट निदर्शनास आली असून याविषयी पनवेल पोलीस स्टेशनमध्ये घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. खारघर सेक्टर १६ मधील अंकित गोविंद नागर यांच्या घरामध्येही चोरी झाली आहे. चोरट्यांनी कुलूप तोडून आतमधील दागिने, कॅमेरा, घड्याळ, लॅपटॉप व इतर साहित्य चोरून नेले आहेत. तीनही घटनांविषयी संबंधित पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत.