शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

नेरळमध्ये घरफोडीचे सत्र सुरूच

By admin | Updated: June 1, 2016 02:47 IST

येथे गेल्या अनेक महिन्यांपासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. नेरळमधील बंद घरांना लक्ष्य करून सोने-चांदीच्या व रोख रक्कम लंपास करण्याच्या घटना चार दिवसाआड घडत आहेत.

नेरळ : येथे गेल्या अनेक महिन्यांपासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. नेरळमधील बंद घरांना लक्ष्य करून सोने-चांदीच्या व रोख रक्कम लंपास करण्याच्या घटना चार दिवसाआड घडत आहेत. सध्या सुटीचा हंगाम सुरू असल्याने तसेच लग्नसराईमुळे अनेक वस्त्यांमधील अनेक घरांतील कुटुंबे गावाला गेली आहेत. त्यामुळे अशी बंद असलेली घरे शोधून चोरटे डाव साधत आहेत. नेरळमध्ये अशाच घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. नेरळमधील निर्माण नगरी येथे सोमवारी (३० मे) एका बंद घराच्या दरवाजाचा कडीकोंयडा तोडून सुमारे ७ लाख ९ हजार ७५० रुपयांचा माल लंपास केल्याची घटना घडली आहे. याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नेरळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेल्या अनेक महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात चोऱ्यांच्या घटना घडल्या आहेत. लग्नसराई व सुटीचा हंगाम असल्याने अनेक जण गावाला जातात. अशी बंद घरे हेरून चोरटे डाव साधत आहेत. अशा अनेक घरांमधून चोरट्यांनी लाखो रु पयांचा ऐवज लंपास करून धुमाकूळ घातला आहे. दिवसाआड अशा गुन्ह्यांची नोंद होत असल्याने पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान आहे. घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल झाले असताना अनेक गुन्ह्यांची उकल होत नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.११ मे रोजी नेरळपाडा येथेचोरी झाली, त्यानंतर २० मे रोजी पुन्हा नेरळपाडा येथे चोरी झाली. त्यानंतर सोमवारी नेरळ निर्माण नगरी येथे एका बंद घराचा कडीकोंयडा तोडून ऐवज लंपास के ला. याप्रकरणी नेरळ पोलिसांनी गुन्हा दाखल के ला आहे.