शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

विभागीय जातपडताळणी कार्यालयाचा भार हलका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 06:53 IST

मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांतील जातपडताळणी प्रकरणे पूर्वी कोकण भवन विभागीय कार्यालयात होत होती. २१ नोव्हेंबरपासून जिल्हानिहाय स्वतंत्र समितीची स्थापना केल्यामुळे कोकण भवन कार्यालयातीचा भार हलका होणार आहे.

प्राची सोनवणे/ लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांतील जातपडताळणी प्रकरणे पूर्वी कोकण भवन विभागीय कार्यालयात होत होती. २१ नोव्हेंबरपासून जिल्हानिहाय स्वतंत्र समितीची स्थापना केल्यामुळे कोकण भवन कार्यालयातीचा भार हलका होणार आहे. त्यामुळे कार्यालयाबाहेर असणाºया रांगा कमी होणार आहेत.प्रवेशित विद्यार्थ्यांचे अर्ज शासनाने ठरवलेल्या शुल्कासह समितीकडे स्वीकारले जातात. या व्यतिरिक्त राखीव प्रवर्गातून नियुक्ती होणारे शासकीय कर्मचारी मागासवर्गीयांच्या राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या उमेदवारांचे अर्ज, तसेच शासनाच्या इतर क्षेत्रातील मागासवर्गीयांच्या सवलतीचा लाभ घेण्याकरिता इतर अर्ज समितीकडे दाखल होत असतात. जातपडताळणी समिती ही त्रीसदस्यीय समिती असते. सध्या समितीकडे सन २०१६-१७ वर्षातील त्रुटीयुक्त प्रकरणे अतिशय अल्पप्रमाणात प्रलंबित असल्याची माहिती जिल्हा कार्यालयाने दिली. याकरिता वेळोवेळी सुनावणीचे आयोजन करून, तसेच दररोज कार्यालयात येणाºया अभ्यागतांना त्याची प्रकरणे प्रत्यक्ष दाखवून अर्जातील त्रुटींबाबत आणि सादर करावयाच्या कागदपत्रांच्या पूर्ततेबाबत समजावून सांगितले जाते, अशी माहिती जिल्हा कार्यालयातील कर्मचाºयांनी दिली. कोकण भवन विभागीय कार्यालयात अभ्यागतांना जास्त वेळ ताटकळत न ठेवता, त्वरित शंकांचे निरसन केले जात असल्याने कार्यालयाबाहेर गर्दी होत नसल्याचेही या वेळी सांगण्यात आले.ठाणे जिल्हा समितीवर मात्र प्रत्यक्षात २ सदस्यांची, म्हणजेच सदस्य व अध्यक्षांची पदे रिक्त असून केवळ सदस्य सचिव सलिमा तडवी या एक च नियमित अधिकारी कार्यरत आहे; परंतु त्यांच्याकडेही पालघर समितीचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. बाळासाहेब सोळंकी प्रादेशिक कोकण आयुक्त विभाग यांच्याकडे सदस्यपदाचा अतिरिक्त कार्यभार, तर उद्यम जाधव अध्यक्ष पालघर समिती यांच्याकडे ठाणे समितीचा अध्यक्षपदाचा अतिरिक्त कारभार सोपविण्यात आला आहे. जिल्हा जातपडताळणी समितीने २०१०पासून समितीकडील प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी वेळोवेळी विशेष मोहीम राबविण्यात आली आहे. २०१५-१६मध्ये सर्व तयार प्रमाणपत्रे एकत्रितपणे वाटप करण्याचे शिबिरही राबविल्याची प्रतिक्रिया सदस्य सचिव सलिमा तडवी यांनी व्यक्त केली.अपुरे मनुष्यबळकार्यालयात शासनाच्या मंजूर पदावरील कर्मचारी संख्या कमी असल्याने बाह्यस्रोताद्वारे बार्टी, पुणे यांच्याकडून कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहे. ठाणे जिल्हा जातपडताळणी विभागाच्या कामाचा बोजवारा पाहता बार्टीहून १२ कर्मचारी नियुक्त करण्यात आल्याची माहिती विभागाने दिली. यामध्ये संशोधक सहायक, व्यवस्थापक, अभिलेखापाल, प्रकल्प सहायक यांचा समावेश आहे.सामाजिक न्याय विभागाने नुकतेच राजपत्र प्रसिद्ध करून अर्जदाराच्या रक्तसंबंधातील नातेवाइकाचे जातपडताळणी प्रमाणपत्र पुरावा म्हणून सादर केल्यास आता १५ दिवसांत वैधताप्रमाणपत्र देण्याचा निर्णय दिला आहे. मात्र, सादर केलेला अर्ज वैध आहे की नाही, याची खातरजमा करण्यासाठी मात्र जास्त कालावधी लागत असल्याने या विभागापुढे पेच पडला आहे.

टॅग्स :newsबातम्याNavi Mumbaiनवी मुंबई