शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

राजकारणातील गुंडगिरी बनली चर्चेचा मुद्दा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 01:44 IST

पक्ष बदलला की गुंडगिरीचा आरोप : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकमेकांवर टीका सुरू

- नामदेव मोरे नवी मुंबई : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी गुंडगिरीवरून  एकमेकांवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. पक्ष बदलला की संबंधीतांवर गुंडगिरीचा ठपका ठेवला जात आहे.  विरोधात असला की गुंड व आपल्या पक्षात आला की जनाधार असलेला नेता अशी साेयीस्कर भूमिका घेतली जात असून हा मुद्दा शहरात चर्चेचा मुद्दा बनला आहे. तुर्भे स्टोअर्समध्ये नुकत्याच झालेल्या भाजपच्या हळदी-कुंकू समारंभात आमदार गणेश नाईक यांनी केलेले भाषण समाज माध्यमांमधून व्हायरल होत आहे. गुंडगिरीला घाबरायचे नाही. कोणी धमकी दिली तर कधीही मला फोन करा. स्थानिकच नाही तर जे इंटरनॅशनल स्तरावरील डॉननासुद्धा  गणेश नाईक माहिती आहे असे वक्तव्य केले होते. भाजप सोडून शिवसेनेत गेलेल्या सुरेश कुलकर्णी यांचे नाव न घेता तुम्ही ज्या शाळेचे विद्यार्थी आहात आम्ही त्याचे हेडमास्तर असल्याचा इशारा दिला आहे. या सभेनंतर गुंडगिरीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. तुर्भे स्टोअर्सचे नेते सुरेश कुलकर्णी यांनी भाजप सोडून शिवसेनेत प्रवेश केल्यापासून त्यांच्यावर गुंडगिरीचा आरोप केला जात आहे. परंतु वास्तवात कुलकर्णी हे तब्बल २५ वर्षे गणेश नाईक यांचे कट्टर समर्थक म्हणून वावरत होते व त्यांना परिवहन सभापती व तीन वेळा स्थायी समितीचे सभापतीपदही देण्यात आले होते. परंतु पक्ष बदलताच त्यांच्यावर टीका केली जात आहे. सर्वच राजकीय पक्ष अशा प्रकारची सोयीस्कर भूमिका घेऊ लागले आहेत. यापूर्वी शिवसेना कुलकर्णी यांच्यावर गुंडगिरीची टीका करत होते. परंतु आता टीका करणारे नेते त्यांचा प्रचार करत आहेत. नवी मुंबईमध्ये गुंडगिरीवरून सोयीस्कर भूमिका घेण्याचे प्रकार यापूर्वीही घडले आहेत. सद्यस्थितीमध्ये शिवसेनेत असलेले माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले हे २००७ पर्यंत गणेश यांचे समर्थक होते.  शिवसेना नेते पूर्वी त्यांच्यावर गुंडगिरीचा आरोप करत. परंतु चौगुले यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर टीका करणारे नेते त्यांचा प्रचार करू लागले व यापूर्वी त्यांचे समर्थन करणारे गणेश नाईक व  त्यांचे पदाधिकारी चौगुले यांच्यावर टीका करू लागले. यादवनगरमधील माजी नगरसेवक रामअशिष यादव यांच्यावरही यापूर्वी शिवसेनेने अनेक वेळा गुंडगिरीचे आरोप केले आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी अनेक वेळा पाठपुरावा केला होता. पण आता तेच यादव शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत. यापूर्वी दिघा परिसरातील मुख्तार अंन्सारी हे राष्ट्रवादीत असताना शिवसेना नेते त्यांच्यावर गुंडगिरीची टीका करत नंतर तेच अन्सारी शिवसेनेचे पदाधिकारी झाले. नवी मुंबईमध्ये अशी अनेक उदाहरणे असून राजकीय पक्षांच्या सोयीस्कर भूमिकेविषयी नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. सत्तेसाठी तत्त्वांशी तडजोडनवी मुंबईमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले आहे. निवडून येण्याची क्षमता असलेल्या माजी नगरसेवक व प्रमुख पदाधिकारी यांना पक्षात घेण्यासाठी  स्पर्धा सुरू झाली आहे. पक्षप्रवेश देताना निवडून येण्याचा निकष पाहिला असून तत्त्वांना मुरड घातली जात  आहे. गुन्हेगारीचा  मुद्दाही सोयीनुसार वापरला जात आहे. आपल्याकडे असेल तर समाजसेवक व विरोधात गेला की गुन्हेगार अशी भूमिका घेतली जात आहे.

टॅग्स :nmmcनवी मुंबई महापालिका