शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

कळव्यात बुलडोझर

By admin | Updated: May 13, 2016 02:17 IST

महापालिकेने अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचा सपाटा सुरूच ठेवला असून गुरुवारी कळव्यात राजकीय नेत्यांच्या कार्यालयांवर कारवाईचा बुलडोझर फिरवला आहे.

ठाणे : महापालिकेने अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचा सपाटा सुरूच ठेवला असून गुरुवारी कळव्यात राजकीय नेत्यांच्या कार्यालयांवर कारवाईचा बुलडोझर फिरवला आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. या कारवाईत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कळवा खाडीलगत असलेले कार्यालय, येथील चौकातील शिवसेना शाखा तसेच येऊर जंगलातील चार बड्या बेकायदा बंगल्यांवरही दिवसभरात बुलडोझर फिरवण्यात आला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक बडा नेता तसेच साहित्य वर्तुळात ‘पाटीलकी’ गाजवणाऱ्या एका सरकारी अधिकाऱ्याच्या बंगल्याचादेखील या कारवाईत समावेश आहे.मुंब्य्रात तब्बल तीन हजारांहून अधिक बांधकामांवर कारवाई केल्यानंतर ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या आदेशानुसार बुधवारी सायंकाळी पोखरण-२ येथील गांधीनगर परिसरातील शिवसेना शाखेवर बुलडोझर फिरवून महापालिकेने राजकीय अतिक्र मणविरोधी कारवाईचा श्रीगणेशा केला. त्यानंतर, सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास येऊरच्या टेकडीवर चार पोकलेन चढवण्यात आले आणि तेथील बंगल्यांवर कारवाई सुरू झाली. ती संपत नाही, तोवर कळव्यातील मुख्य चौकात असलेल्या शिवसेना शाखेचे पाडकाम सुरू करण्यात आले. त्यापाठोपाठ खाडीलगत असलेले जितेंद्र आव्हाड यांचे कार्यालय रिकामे करण्याची कारवाई सुरू झाली. बघताबघता सायंकाळपर्यंत हे कार्यालयही जमीनदोस्त करण्यात आले. ठाणे महापालिकेच्या आजवरच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर राजकीय अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली आहेत. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण, अशोक रणखांब, अतिक्रमण उपायुक्त अशोक बुरपल्ले, संदीप माळवी यांच्या पथकाने येऊर आणि कळव्यात कारवाई केली. (प्रतिनिधी)