शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल आरटीओ लवकरच साकारणार हक्काची इमारत

By admin | Updated: September 18, 2014 23:16 IST

परिवहन कार्यालयाच्या जागेचा प्रश्न मार्गी लागला आहे. सिडकोकडून करंजाडे येथील भूखंड परिवहन विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे.

प्रशांत शेडगे ल्ल पनवेल
परिवहन कार्यालयाच्या जागेचा प्रश्न मार्गी लागला आहे. सिडकोकडून करंजाडे येथील भूखंड परिवहन विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या इमारतीचा आराखडा तयार असून निधीही मंजूर झाला आहे. आचारसंहितेमुळे विधानसभा निवडणुकीनंतर निविदा प्रसिध्द करून प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार असल्याची माहिती परिवहन विभागाच्या अधिका:यांनी दिली.
पनवेल परिसराचा वाढता विस्तार त्याचबरोबर ठाणो परिवहन आणि पेण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयावर ताण पडत होता. स्थानिकांच्या मागणीनुसार पनवेल परिसराकरिता स्वतंत्र आरटीओ कार्यालय व्हावे याकरिता शासनाकडे मागणी केली होती. या संदर्भात त्यांनी वारंवार पाठपुरावाही केला होता. या मागणीची दखल घेत राज्य परिवहन विभागाने नोव्हेंबर 2क्1क् मध्ये ठाणो प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे विभाजन करून पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू केले, त्याचबरोबर पेण कार्यालयावरील ताण कमी करण्याकरिता पनवेल, कजर्त, खालापूर या तालुक्यांकरिता पनवेल उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू केले. पेण कार्यालयावरील ताण कमी करण्याकरिता पनवेल, कजर्त, खालापूर या तालुक्यांकरिता पनवेल उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्यात आले. सध्या कळंबोली स्टील मार्केटमध्ये हे कार्यालय सुरू आहे. या ठिकाणीही जागा अपुरी पडत असून अवजड वाहनांच्या गर्दीत सर्व कर्मचारी आणि अधिका:यांचा श्वास गुदमरत आहे. 
पनवेल आरटीओ कार्यालयाला हक्काची आणि मुबलक जागा असावी याकरिता गेल्या तीन वर्षापासून शोध सुरू होता. याकरिता परिवहन अधिका:यांनी सिडकोकडे सातत्याने पाठपुरावा केला. या कामी सिडकोने सकारात्मक भूमिका घेतली. या वर्षाच्या सुरूवातीलाच झालेल्या बोर्डाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी मिळाली. गेल्या काही महिन्यात सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करून हा भूखंड परिवहन विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे.
 
करंजाडेत उभे राहणार कार्यालय
नव्याने विकसित होत असलेल्या करंजाडे नोडमध्ये 345क् चौरस मीटरचा भूखंड देण्याचा निर्णय सिडको संचालक मंडळाच्या बैठकीत झाला होता. नगरविकास विभागाची मंजुरी आणि सर्व तांत्रिक बाबीची पूर्तता झाल्याने ही जागा परिवहन विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. त्यानंतर या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून अत्याधुनिक स्वरूपाचे कार्यालय उभारण्यात येणार आहे. हा परिसर पनवेल शहराच्या बाहेर असल्याने तपासणीकरिता कोणत्याही अडचणी येणार नाहीत.