शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

बिल्डर कंधारीच्या आत्महत्येचे गूढ लवकरच उलगडणार?

By admin | Updated: May 12, 2016 02:25 IST

स्वराज डेव्हलपर्सचे राज कंधारी यांच्या आत्महत्येचा उलगडा करण्यासाठी पोलीस कसून तपास करत आहेत. कंधारी यांचे व्यावसायिक वाद असल्याचेही निदर्शनास आले आहे

नवी मुंबई : स्वराज डेव्हलपर्सचे राज कंधारी यांच्या आत्महत्येचा उलगडा करण्यासाठी पोलीस कसून तपास करत आहेत. कंधारी यांचे व्यावसायिक वाद असल्याचेही निदर्शनास आले आहे. फसवणूक करणाऱ्यांविरोधात त्यांनी वाशी व ऐरोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे नोंदविले असून त्यांच्याविरोधातही फसवणूक व इतर गुन्हे दाखल आहेत. बांधकाम व्यावसायिक राज कंधारी यांच्या पार्थिवावर बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेचा कसून तपास करावा या मागणीसाठी शहरातील व्यावसायिकांनी काळ्या फिती लावल्या होत्या. दरम्यान, पोलिसांनी कंधारी यांनी कौटुंबिक कलहामधून की व्यावसायिक वादामुळे आत्महत्या केली याविषयी तपास सुरू केला आहे. कंधारी यांनी २०१४ व १५ मध्ये वाशी व ऐरोली पोलीस स्टेशनमध्ये त्यांची फसवणूक करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. याशिवाय त्यांच्याविरोधात फ्लॅटची विक्री केल्यानंतर प्रत्यक्ष ताबा न दिल्याप्रकरणी ७ गुन्हे दाखल झाले आहेत. बांधकाम व्यवसायातील पैसे थकविणे, बांधकाम साहित्य परत न देणे, धनादेश न वटल्याचे गुन्हेही दाखल आहेत. बेस्ट चालकाच्या तक्रारीवरून शासकीय कामकाजात अडथळे आणल्याचे गुन्हेही दाखल आहेत. ठाणे आयुक्तालयामधील श्रीनगर पोलीस स्टेशनमध्येही त्यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. कंधारी यांचे चेंबूर, दिघा, उलवे, पनवेल परिसरात इमारतींचे बांधकाम सुरू आहे. घणसोलीमधील प्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे. याशिवाय दिघा मधील स्मशानभूमीच्या बांधकामाचा ठेकाही त्यांना मिळाला आहे. याशिवाय नैना परिसरामध्येही त्यांनी मोठी गुंतवणूक केली आहे. त्यांची विविध ठिकाणी कामे सुरू आहेत. यामुळे व्यावसायिक व खरेदीचे वाद, कौटुंबिक कलह की दुसऱ्या कारणांनी त्यांनी आत्महत्या केली याचा तपास सुरू आहे.