शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

बजेटमधील घरांच्या निर्मितीला वाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 02:56 IST

मुंबईत वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी नवी मुंबईची निर्मिती करण्यात आली. या शहराचा विकास झपाट्याने होत आहे.

नवी मुंबई : मुंबईत वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी नवी मुंबईची निर्मिती करण्यात आली. या शहराचा विकास झपाट्याने होत आहे. लोकसंख्येचा आलेख उंचावत आहे. अत्याधुनिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. आगामी काळात बजेटमधील घरांसाठी महाराष्ट्रावरील ताण कमी करण्याची क्षमता नवी मुंबई शहरात आहे, असा विश्वास राज्याचे गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी व्यक्त केला.मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेच्या पार्श्वभूमीवर सिडकोच्या वतीने वाशी येथे परवडणारी घरे आणि ब्ल्यू इकॉनॉमी या विषयावर एकदिवशीय विशेष परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेचे उद्घाटन गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांच्या हस्ते करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. नवी मुंबईच्या विकासात सिडकोचे मोलाचे योगदान राहिले आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत २०२२ पर्यंत २० लाख घरे निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे, त्यात नवी मुंबईचा हातभार मोठा असेल. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाचे आता भूमिपूजन झाले आहे. एकूणच राज्याची दुसरी आर्थिक राजधानी म्हणून नवी मुंबई शहराची ओळख निर्माण होत असल्याचे समाधान मेहता यांनी व्यक्त केले.सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी प्रास्ताविकात परिषदेचा हेतू विशद केला. दहा वर्षांत १५ हजार घरे निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्या दृष्टीने कार्यवाही सुरू करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. ब्ल्यू इकॉनॉमी अर्थात सागरी क्षेत्राशी संबंधित उद्योगांना देशाच्या अर्थकारणात मोठा वाव असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी महापौर जयवंत सुतार, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे, पनवेलच्या महापौर कविता चौतमोल, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर व आमदार नरेंद्र पाटील आदींची भाषणे झाली. परवडणारी घरे या विषयावरील चर्चासत्रात म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हैसकर यांनी पंतप्रधान आवास योजनेची माहिती दिली. सिडकोचे मुख्य अभियंते केशव वडखेडकर, हुडकोचे कार्यकारी संचालक व्ही. टी. वालवान, क्रेडाईचे अध्यक्ष मयूरेश शहा आदींनी भाग घेतला, तर सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी विनय कारगांवकर यांनी ब्ल्यू इकॉनॉमी विषयावर अभ्यासपूर्ण माहिती दिली.