शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

भूल देऊन म्हशींच्या तस्करीचा डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 12:27 AM

खारघर शहरात नजीकच्या काळात गुंगीचे इंजेक्शन देऊन गायी, म्हशींच्या तस्करीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

पनवेल : खारघर शहरात नजीकच्या काळात गुंगीचे इंजेक्शन देऊन गायी, म्हशींच्या तस्करीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. रविवारी सायंकाळीदेखील असाच प्रकार सेक्टर २१ जवळील श्री रविशंकर शाळेसमोर घडला. दोन म्हशींना गुंगीचे औषध दिल्याने या म्हशी या ठिकाणी बेशुद्ध अवस्थेत आढळल्याचे या म्हशींची तस्करी करण्याचा डाव येथील रहिवाशाच्या सतर्कतेमुळे फसल्याचे पाहावयास मिळाले.रविवारी रात्री ७ वाजून ४५ मिनिटांनी हा प्रकार घडला. यावेळी या परिसरातील कुत्रे मोठ्या प्रमाणात भुंकत असल्याचे येथील रहिवाशांच्या लक्षात आले. यावेळी या ठिकाणी असलेल्या एका लॅबच्या मालकाला त्या परिसरात दोन म्हशी बेशुद्ध अवस्थेत पडल्याच्या दिसून आल्या, तसेच दुचाकीवर दोन तरुण या ठिकाणी संशयास्पदरीत्या फिरत असल्याचे लक्षात आले. येथील रहिवाशांनी पोलीस, तसेच प्राणिमित्रांना घटनास्थळी बोलावले.पोलिसांनीदेखील घटनास्थळी पाहणी करीत पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना म्हशींची तपासणी करण्यासाठी बोलवले. या परिसरातील नागरिकांचा मोठा जमाव जमल्याचे पाहावयास मिळाले. रात्री १२ वाजेपर्यंत नागरिकांची गर्दी सुरू होती. काही वेळात म्हशींच्या मालकांना घटनास्थळी बोलावण्यात आले. म्हशी शुद्धीवर आल्याने त्यांना मुर्बी येथील तबेल्यात हलविण्यात आले. संबंधित घटने संदर्भात कोणताही गुन्हा खारघर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेला नाही.खारघर शहरात असे प्रकार वाढत चालले असून मोठ्या प्रमाणात गायी म्हशींची तस्करी खारघर शहरात सुरू असल्याचा आरोप प्राणिमित्र शैलेश खोतकर यांनी केला. या संदर्भात सखोल तपास करण्याची आवश्यकता असल्याची खोतकर यांनी सांगितले.