शैलेश चव्हाण/ ऑनलाइन लोकमतनवी मुंबई, दि. 25 - कळंबोलीत आज सकाळी ११ च्या सुमारास दोन भवांमध्ये झालेल्या अंतर्गत वादातुन मोठया भावाने रहात्या घरात धाकट्या भावाचा धारदार सु-याने भोसकुन हत्याकेली खुन केल्यानंतर आरोपी भाऊ स्वता पोलिस ठाण्यात हजर झाला व गुन्हा कबुल केला या हत्येनंतर कळंबोली शहरात एकच खळबळ पसरली आहे. कळंबोली येथील एल आय जी शहरात तुळजा भवानी मंदिरा शेजारी रहात्या घरी हि घटना घडली .राजेश बाबल्या जाधव ३२ असे मृत युवकाचे नाव असुन त्याचा मोठा भाऊ मंगेश जाधव ३५ याने दोघांमधील अंतर्गत वादातुन हा खुन केल्याचे समोर येत आहे. घरी ५९ वर्षाची आई व हि दोन मुले एकत्रीत रहात होती शेजारींच्या म्हणन्यानुसार दोघ हि दारु पित असत व वारंवार दोघांत वाद होत होते दोघही अविवाहित असुन या प्रकारानंतर वृध्द आईने ररक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या धकट्या मुलाकडे पाहुन हंबरडा फोडला. नेमके दोघात काय वाद झाले होते याचा तपास कळंबोली पोलिस वरिष्ठ कोंडीराम पोपेरे करत आहेत .
भाऊ सख्खे वैरी पक्के, मोठ्याने केला धाकट्याचा खून
By admin | Updated: June 25, 2017 14:32 IST