नवी मुंबई : पती-पत्नीचे भांडण सोडवण्यासाठी आलेल्या भावाच्या गळ्यावर ब्लेडने वार झाल्याचा प्रकार वहाळ गावात घडला आहे. याप्रकरणी एनआरआय पोलिसांनी पतीला अटक केली आहे. तर जखमी भावावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इसाक कुरेशी असे पोलिसांनी अटक केलेल्या पतीचे नाव आहे. त्याच्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इसाक हा घरगुती वादातून त्याच्या पत्नीला मारहाण करत होता. या वेळी त्याचा भाऊ रफिक हा वहिनीच्या मदतीसाठी धावून गेला; त्याचा राग आल्याने इसाकने आपला भाऊ रफिक याच्या गळ्यावर धारदार ब्लेडने वार केला. (प्रतिनिधी)
पती-पत्नीच्या भांडणात भावावर हल्ला
By admin | Updated: April 16, 2017 04:39 IST