शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

दिराने केली भावजय, पुतण्याची हत्या; कामोठेतील धक्कादायक प्रकार, आरोपीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2019 02:24 IST

सुरेश काही दिवसांपासून बेकार होता. काही कामधंदा करीत नसल्याने त्याचे घरातल्यांसोबत नेहमी खटके उडत होते.

पनवेल : कामोठे शहरात दिराने आपली भावजय व दोन वर्षांच्या पुतण्याची हत्या केल्याची घटना सोमवारी रात्री उशिरा उघड झाली. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयश्री योगेश चव्हाण (२२) व अविनाश चव्हाण (२) अशी हत्या झालेल्यांची नावे आहेत.

कामोठे सेक्टर ३४ येथील एकदंत सोसायटीतील रूम नंबर ३०४ मध्ये योगेश चव्हाण हे पत्नी जयश्री (२२), मुलगा अविनाश (२) व भाऊ सुरेश (३०) यांच्यासह राहतात. योगेश हे सुरक्षा रक्षक म्हणून काम करीत असून सोमवारी ते कामावर गेले होते. सुरेश हा योगेशचा मोठा भाऊ असून अविवाहित आहे. त्यांचे आई-वडील हे गणपतीसाठी शिराळा, सांगली या आपल्या गावी गेले होते.

सुरेश काही दिवसांपासून बेकार होता. काही कामधंदा करीत नसल्याने त्याचे घरातल्यांसोबत नेहमी खटके उडत होते. आई-वडील व भावासोबत भांडण होत असे. त्यातून काही दिवसांपूर्वी योगेशने सुरेशला घराबाहेर काढले होते. याच गोष्टीचा प्रचंड राग सुरेशच्या मनात होता.

तोच राग मनात ठेवून सोमवारी घरात कोणी नसल्याचा फायदा घेत सुरेश योगेशच्या घरी गेला. भावजय जयश्रीशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने जयश्रीला ठार मारले. एवढ्यावरच तो थांबला नाही तर त्याने जयश्रीचा दोन वर्षाचा मुलगा अविनाश याच्यावरही राग काढला. उशीने तोंड दाबून त्याचाही जीव घेतला. या प्रकारानंतर सुरेश घरात बसून राहिला व झोपी गेला. सोमवारी रात्री ११ च्या सुमारास योगेश घरी आल्यानंतर त्याने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला मात्र दरवाजा उघडता आला नाही. त्यामुळे त्यांनी शेजाऱ्यांची मदत घेऊन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला.

यावेळी सुरेश हॉलमध्ये झोपला होता तर जयश्री व मुलगा अविनाश यांचे मृतदेह बेडरूममध्ये आढळले. त्यामुळे योगेशने कामोठे पोलिसांना याबाबत माहिती दिली. कामोठे पोलिसांनी घटनास्थळावरून सुरेशला अटक केली आहे. याबाबत पोलिसांचा अधिक तपास सुरू असल्याचे कामोठे पोलिसांनी सांगितले.जयश्रीचा छळ झाल्याचा नातेवाईकांंचा आरोपजयश्री व अविनाश यांची सुरेशने दुपारीच हत्या केल्याचे समोर आले आहे. जयश्रीचे माहेर आटूकडेवाडी (शिराळा, सांगली) येथील असून, त्यांचे योगेश सोबत ३ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. चव्हाण कुटुंबीय १५ वर्षांपासून कामोठे येथे राहत आहेत, तर सासरी जयश्रीचा छळ सुरू होता, असा आरोप तिच्या नातेवाइकांनी केला आहे.