शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

सिडको बांधणार संरक्षण भिंत : भूखंडावरील अतिक्रमणांना लगाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 02:18 IST

सिडको बांधणार संरक्षण भिंत : झोपड्या, डेब्रिज हटविण्याची मागणी

कळंबोली : कळंबोली सिडको वसाहतीतील मोकळ्या भूखंडावर होणारे अतिक्रमण थांबवण्यासाठी संरक्षण भिंत बांधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी तारेचे कुंपण घातले जाणार आहे. लवकरच सर्व मोकळे भूखंड सिडकोकडून बंदिस्त केले जाणार असल्याने पुन्हा या ठिकाणी अतिक्रमण होणार नाही, असा विश्वास सिडकोकडून व्यक्त करण्यात आला आहे.

कळंबोली सिडको वसाहतीत सिडकोचे अनेक भूखंड रिकामे, पडीक आहेत. मोकळ्या जागेचा वापर होत नसल्याने येथे झोपड्यांचे अतिक्रमण होत आहे. तसेच कचरा, डेब्रिजही टाकले जाते. तर काही ठिकाणी झाडे-झुडपेही मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. गृहनिर्माण, वाणिज्य, मैदान, क्रीडांगण, उद्यान इतर अनेक कारणांकरिता राखीव असलेले भूखंड मोकळे आहेत. महापालिका झाली असली तरी या भूखंडांची मालकी सिडकोकडेच आहे. त्यामुळे या जागेवर अतिक्रमण रोखण्याकरिता मोकळ्या भूखंडावर संरक्षण भिंत बांधण्याचे काम सिडकोने हाती घेतले आहे. कळंबोलीतील सेक्टर १३ येथील सिडको कार्यालयासमोर असलेल्या भूखंडावर झोपड्यांनी बस्तान मांडले आहे. येथे मोठ्या प्रमाणात डेब्रिजही टाकण्यात आले आहे. सिडको अतिक्रमण विभागाकडून पाच ते सहा वेळा झोपड्यांवर हातोडा मारण्यात आला; परंतु काही दिवसांतच पुन्हा झोपड्या उभारल्या जात असत, त्यामुळे संरक्षण भिंत तसेच तारेचे कुंपण करण्याचे काम ठेकेदाराला देण्यात आले आहे.भूखंडावर झोपड्या, डेब्रिज जैसे थेसिडकोकडून संरक्षण भिंत बांधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे; परंतु भूखंडावर असलेल्या झोपड्या, डेब्रिज जैसे थे असल्याने संरक्षण भिंतीचा उपयोग कशासाठी होणार आहे, असा प्रश्न रहिवासी हर्षल भोसले यांनी उपस्थित केला आहे. बांधकाम करण्याआधी झोपड्या व डेब्रिज हटवणे, अपेक्षित असताना तसे न करताच भिंत बांधली जात आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई