शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

कर्जतमधील उल्हास नदीवरील पूल निधीच्या प्रतीक्षेत; ग्रामस्थ त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 00:33 IST

शिरसे - आवळस गावांना समांतर नवीन पूल बांधण्याची मागणी

कर्जत : स्वातंत्र्योतर काळापासून कर्जत तालुक्यातील उल्हास नदीवर शिरसे - आवळस गावांना समांतर नवीन पूल बांधण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून सातत्याने होत होती. परंतु या कामास निधी उपलब्ध होत नसल्याने हे काम सुरू होऊ शकलेले नाही.             

कर्जत शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेले आवळस गाव. परंतु उल्हास नदीवर शिरसे - आवळस गावांना समांतर पूल नसल्याने नागरिकांना आठ ते दहा किमीचा वळसा घालून प्रवास करावा लागतो. याचा सर्वाधिक त्रास हा आजारी रुग्ण किंवा गरोदर माता, भगिनींना दवाखान्यात नेत असताना होतो. पूल नसल्याने काही नागरिक वेळेत दवाखान्यात पोहोचू शकले नाहीत, म्हणून त्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच काही नागरिक आपला वेळ वाचावा यासाठी पावसाळी भरलेल्या नदी पात्रातून आपला जीव धोक्यात घालून प्रवास करतात. दुसरा त्रास हा लहान चिमुकल्यांना शाळेत जाताना होत आहे. कालानुरूप शिक्षण व्यवस्था बदलत असल्याने इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेण्यासाठी गावातील मुलांना कर्जत येथे जावे लागते. याकरिता आठ ते दहा किमीचा वळसा मारून प्रवास करावा लागत असल्याने त्याचा आर्थिक भुर्दंडही सर्वसामान्य नागरिकांना भोगावा लागत आहे. या परिसरातील राष्ट्रवादीचे एक कार्यकर्ते गणेश  भोईर यांनी  पालकमंत्री अदिती तटकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना  संबंधित विभागांस सूचना कराव्यात, अशी मागणी केली आहे.

टॅग्स :Karjatकर्जतRaigadरायगड