शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
4
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
5
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
6
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
7
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
8
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
9
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
10
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
11
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
12
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
13
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
14
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
15
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
16
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 
17
भाच्याच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
18
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
19
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
20
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी

पालिकेच्या विकासकामांना ब्रेक

By admin | Updated: August 13, 2015 23:41 IST

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोट्यवधी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आल्यामुळे आणि सरकारने एलबीटी बंद केल्यामुळे महापालिकेची गंगाजळी आटली आहे.

नामदेव मोरे , नवी मुंबईनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोट्यवधी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आल्यामुळे आणि सरकारने एलबीटी बंद केल्यामुळे महापालिकेची गंगाजळी आटली आहे. त्यामुळे तब्बल १६० कोटी रुपयांची कामे थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १ हजार कोटींपेक्षा जास्त रकमेची कामे सुरू असून ठेकेदारांना बिले देण्यासही विलंब होत आहे. राज्यातील श्रीमंत महापालिकांमध्ये नवी मुंबईचा समावेश होतो. पालिकेची आर्थिक स्थिती चांगली होती. परंतु मागील दोन वर्षांत घडी विस्कटू लागली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तब्बल साडेसातशे कोटी रुपयांच्या कामांना १५ दिवसांत मंजुरी देण्यात आली होती. विधानसभा व महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही कोट्यवधी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली. पालिकेच्या उत्पन्नापेक्षा अधिक खर्चाची कामे काढल्यामुळे तिजोरी रिती होऊ लागली. त्यामुळे मागील काही महिन्यांमध्ये पालिकेचा आर्थिक गाडा चालविताना प्रशासनास तारेवरची कसरत करावी लागत आहे. पूर्वी बिले सादर झाली की ठेकेदारांना तत्काळ पैसे दिले जात. परंतु आता अनेकांना पैशासाठी वाट पहावी लागत आहे. सरकारने एलबीटी बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे आर्थिक अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या उत्पन्नामध्ये मोठा फरक पडणार असल्यामुळे प्रशासनाने काटकसर सुरू केली आहे. आयुक्त दिनेश वाघमारे यांनी अनावश्यक कामे न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पालिकेने मंजूर केलेली जवळपास १६० कोटी रुपयांची कामे थांबविण्यात आली आहेत. ज्या ठेकेदारांनी कामे घेतली आहेत तेही हवालदिल झाले आहेत. वेळेत कार्यादेश मिळाला नाही तर कामाचा खर्च वाढण्याची व नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. लवकर कार्यादेश मिळावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जी कामे सुरू आहेत ती आधी पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. १ हजार कोटीपेक्षा जास्त रकमेची कामे सुरू आहेत. १५० ते २०० कोटींची कामे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. काहींची निविदा प्रक्रिया सुरू आहे. महापालिकेला गतवर्षी एलबीटीच्या माध्यमातून तब्बल ७३० कोटी रुपये मिळाले होते. उत्पन्नाचा महत्त्वाचा मार्ग बंद झाला आहे. सेसची जवळपास १ लाख ८५ हजार प्रकरणे प्रलंबित आहेत. एलबीटीची व सेसची सर्व प्रकारची थकबाकी जवळपास २५० कोटींवर गेली आहे. मालमत्ता कराची थकबाकी व व्याज जवळपास १५० कोटींपर्यंत गेले आहे. महापालिकेच्या तिजोरीत ठणठणाट झाला असून सरकारने एलबीटीला पर्यायी निधी दिला नाही तर अनेक कामे रखडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.