शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 05:45 IST

नवी मुंबईत शनिवारी सायंकाळी एक मिक्सर ट्रक लक्झरी कारला घासून गेल्याने वाद झाला होता. कारचालकाने ट्रक चालकाला धमकावून त्याला कारमध्ये घालून अपहरण केले, अशी फिर्याद नवी मुंबईतील रबाळे पोलिस ठाण्यात देण्यात आली.

नवी मुंबई/पुणे : ऐरोली येथील मिक्सर चालकाच्या अपहरणात निलंबित प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर व बाउन्सर प्रफुल्ल साळुंखे यांचे नाव निष्पन्न झाले आहे. या दोघांचाही रबाळे पोलिस शोध घेत आहेत. तपासादरम्यान रबाळे पोलिसांची अडवणूक केल्याप्रकरणी पूजा यांची आई मनोरमा खेडकर यांच्यावर पुण्यातील चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, अपहरणाच्या गुन्ह्यात त्यांना सहआरोपी केल्याचे पोलिस उपायुक्त पंकज डहाणे यांनी सांगितले.

नवी मुंबईत शनिवारी सायंकाळी एक मिक्सर ट्रक लक्झरी कारला घासून गेल्याने वाद झाला होता. कारचालकाने ट्रक चालकाला धमकावून त्याला कारमध्ये घालून अपहरण केले, अशी फिर्याद नवी मुंबईतील रबाळे पोलिस ठाण्यात देण्यात आली. त्यानंतर रबाळे पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक दिलीप खरात यांचे पथक खेडकर यांच्या पुण्यातील बाणेर येथील बंगल्यात रविवारी दुपारी दीडच्या सुमारास चौकशीसाठी पाेहोचले. त्या ठिकाणी  त्याला डांबून ठेवल्याचे निष्पन्न झाले. मात्र, त्याच्या सुटकेसाठी व गाडीचा ताबा देण्यासाठी पूजाची आई मनोरमा खेडकर यांनी असहकार्य करून अडथळा केला.

चतु:शृंगीत गुन्हा

या प्रकरणी रबाळे पोलिसांच्या तक्रारीवरून पुण्याच्या चतुःशृंगी पोलिस ठाण्यात मनाेरमा यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

अपहरणाच्या गुन्ह्यातील पती व त्यांचा बाउन्सर यांना सहकार्य केल्याप्रकरणीही रबाळेच्या गुन्ह्यात त्यांना सह आरोपी केल्याचे उपायुक्त डहाणेंनी सांगितले.

फिर्यादीत काय म्हटलंय?

सहायक निरीक्षक दिलीप खरात यांनी फिर्यादीत म्हटले, मनोरमा यांनी बंगल्याचा दरवाजा उघडला. सहायक पोलिस निरीक्षक दीपक खरात यांनी त्यांना गुन्ह्याची माहिती दिली. खेडकर यांना तपासात मदत करण्यास सांगितले. तेव्हा खेडकर यांनी बंगल्याचा दरवाजा बंद करून घेतला.

चतु:शृंगी पोलिस घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत खेडकर यांनी अपहरण करणाऱ्या कारचालकला पसार होण्यास मदत केली. आरोपी कार घेऊन पसार झाला. तसेच बंगल्यात पाळीव श्वान सोडून पोलिसांना चौकशीसाठी अटकाव केला.