शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

तळा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला - तटकरे

By admin | Updated: January 5, 2017 06:01 IST

तालुक्याच्या निर्मितीनंतर २००२ साली पंचायत समिती गण आणि जिल्हा परिषद गटांची निर्मिती झाली. या मागील तीन निवडणुकांमध्ये युवक महिला आणि कार्यकर्त्यांनी मेहनत घेऊन

अलिबाग : तालुक्याच्या निर्मितीनंतर २००२ साली पंचायत समिती गण आणि जिल्हा परिषद गटांची निर्मिती झाली. या मागील तीन निवडणुकांमध्ये युवक महिला आणि कार्यकर्त्यांनी मेहनत घेऊन, तळा तालुका हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला बनवला याचा अभिमान वाटत आहे. सर्व धर्मीयांनी ताकद उभी केली म्हणून शंभर टक्के यश मिळाले आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे यांनी के ले. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पार्श्वभूमीवर तळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा तळा तालुक्यामध्ये आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी ते बोलत होते.या वेळी त्यांनी भाषणात शिवसेना नेत्यांचा खरपूस समाचार घेतला. खासदारकीच्या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माणगावमध्ये दिल्ली मुंबई कॅरिडॉरला विरोध करत शेतकऱ्यांच्या मागे ठाम राहणार, अशी भूमिका मांडली आणि आता सत्तेत आल्यावर हा प्रकल्प मार्गी लागण्यासाठी पहिली सही असेल तर ती शिवसेनेचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची.नगरपालिका निवडणुकीदरम्यान रोहा येथे नोटाबंदीला विरोध करत, केंद्रीय मंत्री यांनी राजीनामा देण्याची भाषा केली आणि आपली तुलना सी. डी. देशमुखांबरोबर केली. जैतापूरला आतून विरोध करायचा आणि सरकारमध्ये वेगळी भूमिका मांडायची. स्वत:च्या सावलीला भिणारे जनतेला काय न्याय मिळवून देणार? असा खडा सवाल त्यांनी केला. या मेळाव्यासाठी समाजकल्याण सभापती गीता जाधव, कार्याध्यक्ष प्रमोद घोसाळकर, पं.स. सभापती शेवंता अडखळे आदी उपस्थित होते.