ऑनलाइन टीम
ठाणे, दि. १८ - एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी डोंबिवली पोलिसांनी आज दोन जणांना अटक केली. रोहन भोईर आणि अबू अन्सारी अशी या दोन आरोपींची नावे असून या आरोपींनी गुन्हयाची कबुली दिली आहे.
पीडित तरूणी आरोपी रोहन भोईरला ओळखत होती. परंतू त्याचे नाव तिला माहित नव्हते. रात्री पीडित तरूणी समोरून जात असताना आपला वाढदिवस असल्याचे सांगून आरोपी रोहन भोईरने तिला ज्यूस पिण्याचा आग्रह केला. या ज्यूसमध्ये नशेचे औषध मिसळून तिला बेशुध्द केले. त्यानंतर दोघांनी या मुलीवर अत्याचार केला. दरम्यान, हे दोघेही आरोपी १० वी नापास असून कॉलेजच्या अवतीभोवती फिरताना दिसत होते. कॉलेज कॅम्पस मधून जाताना मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध लावला.