शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
2
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
3
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
4
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
5
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
6
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
7
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
8
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
9
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
10
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
11
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
12
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
13
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
14
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
15
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
16
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
17
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
18
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
19
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
20
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा

तळोजा पाचनंदचे दोन्ही फेज समस्यांच्या गर्तेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 01:22 IST

रस्त्यांची दुरवस्था, धुळीचे साम्राज्य : पायाभूत सुविधांकडे सिडकोचे दुर्लक्ष

अरुणकुमार मेहत्रे

कळंबोली : सिडकोच्या तळोजा पाचनंद मधील दोन्ही फेजमध्ये सध्या मोठ्याप्रमाणात विकास कामे सुरू आहेत. त्यामुळे येथील लोकवस्तीसुध्दा वाढू लागली आहे. असे असले तरी या परिसरात पायाभूत सुविधांचा मात्र पुरता बोजवरा उडाल्याचे दिसून येते. रस्त्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. तसेच धुळीचे साम्राज्य पसरल्याने रहिवासी त्रस्त झाले आहेत. पायाभूत सुविधा निर्माण करण्यात सिडकोकडून कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाही.

नावडे आणि त्यानंतर तळोजा पाचनंद ही नागरी वसाहत उभारण्याचे काम गेल्या काही वर्षांपासून सिडकोने हाती घेतलेले आहे. तळोजा पाचनंद हा नोड दोन फेजमध्ये विभागला गेला आहे. त्यापैकी फेज-२ हा संपूर्ण दुर्लक्षित असल्याचे राहिला आहे. येथे पुरेसे पाणी येत नसल्याच्या रहिवाशांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे ऐन पावसाळ्यातही या वसाहतीत पाणी मिळत नव्हते. या भागात मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू आहेत. परंतु त्यांना लागणाऱ्या पाण्याचे नियोजन सिडकोकडे नाही. त्यामुळे भविष्यात या परिसरात मोठ्याप्रमाणात पाणीसमस्या भेडसावण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. खड्ड्यातील खडी आणि माती बाहेर आली आहे. पाचनंद कॉर्नर सेक्टर २४ येथे रस्त्याची चाळण झाली आहे. समोरच मेट्रोचे मोठे यार्ड आहे. त्यामुळे डंपर, ट्रक या अवजड वाहनांची सतत ये-जा सुरू असते. भरधाव वेगाने वाहणाºया ट्रक आणि डंपर मुळे येथील रहिवाशांना जीवमुठीत घेवून चालावे लागते. त्याचबरोबर या जड वाहनाने येथील रस्ते डॅमेज करून टाकले आहेत. बांधकामासाठी माती रेती, खडी वाहिली जात आहे. ती रस्त्यावर सांडल्याने आणखी दुरावस्था होत आहे. ग्रीन कॉर्नर सेक्टर २६ येथेही रस्ता चांगला नसल्याने वाहनांना कसरत करावी लागत आहे. फेज - १ कडे जाणाºया रस्त्याची देयनीय अवस्था आहे. मेट्रो करिता जो पूल बांधण्यात आला आहे. त्याच्याखाली रस्ताच शिल्लक राहिलेला नाही. या परिसरातील पावसाळी नाल्यांत बेसुमार गवत वाढले आहे. फेज-१ मध्ये पाण्याच्या पाईप लाईन्स तसेच केबल टाकण्यासाठी रस्ते खोदण्यात आले आहेत. पदपथांची सुद्धा अवस्था चांगली नाही. काही प्लॉट वर सिडकोने कुंपण घातलेले आहे. मात्र आत मध्ये जंगल वाढलेले आहे. मुलांना खेळण्या साठी क्रीडांगणचा अभाव तळोजाच्या दोन्ही फेजमध्ये दिसून येतो.पदपथावर कार्यालयतळोजा फेज दोन मध्ये अनेक इमारतीचे काम सुरू आहे. बिल्डरांनी बांधकाम साहित्य रस्ते आणि पदपथावर टाकून दिले आहे. सेक्टर १६ येथील फ्लॉट क्रमांक २0 आणि २९ या इमारतीचे बांधकाम चालू आहे. तिथे पदपथावरच बिल्डर कडून कंटेनर टाकून बुकिंग आॅफिस सुरू करण्यात आले आहे. महानगरपालिका आणि सिडकोचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे.तळोजा पचनंद फेज १ तसेच फेज २ मधील वसाहतीत सुविधा पुरवण्यात येत आहेत. या ठिकाणी नवीन वसाहत होत आहे. वसाहतीत बरीच कामे चालू आहेत. त्यामुळे गरजेनुसार टप्या टप्याने पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे काम सुरू आहे.- मिलिंद म्हात्रे, कार्यकारी अभियंता सिडकोसिडकोने तळोजा फेज १ व फेज २ या वसाहती निर्माण करत आहे. पण त्यासाठी लागणा-या सुविधांचा वानवा आहे. पाणी समस्या , रस्ते , स्वच्छतागृह आदी समस्या भेडसावत आहेत. याबाबत वारंवार सिडकोच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत . तर त्याबाबत सिडकोने लक्ष द्यावे यासाठी पाठपुरावा ही केला जात आहे. - हरेश केणी, नगरसेवकस्वच्छतागृहांचा अभावतळोजा पाचनंद फेज- १ येथे मेट्रोचा डेपो आहे. आणि फेज -२ मध्ये कामासाठी यार्ड तयार करण्यात आले आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात कामगार काम करतात. तसेच शेकडो इमारतींचे बांधकामे सुरू आहेत. त्यामुळे या दोन्ही विभागात दररोज हजारो मजूर कामाला येतात. तसेच फेरीवाले, विक्रेते, रिक्षा चालक यांचीही संख्या मोठी आहे. परंतु येथे सार्वजनिक स्वच्छतागृहांचा अभाव आहे. सेक्टर-८ येथे सिडकोने सार्वजनिक स्वच्छतागृह बांधले आहे. त्यावर महापालिकेच्या नावाने रंगरंगोटी करण्यात आली आहे. परंतु येथे पाणी नसल्याने गैरसोय होत आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई