शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

दोघांना ऑनलाईन १ कोटी १२ लाखाचा गंडा नफ्याचे आमिष पडले महागात; सायबर गुन्ह्यांबाबत नागरिकांमध्ये अज्ञान

By सूर्यकांत वाघमारे | Updated: December 7, 2023 18:28 IST

ऑनलाईन आमिषांना बळी पडल्याने दोघांची १ कोटी १२ लाखाची फसवणूक झाली आहे.

नवी मुंबई : ऑनलाईन आमिषांना बळी पडल्याने दोघांची १ कोटी १२ लाखाची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एकाची पार्ट टाईम नोकरीच्या बहाण्याने २८ लाख ९० हजाराची फसवणूक झाली आहे. तर दुसऱ्याची टेडिंगच्या बहाण्याने ८० लाख १६ हजाराची फसवणूक झाली आहे. 

सायबर गुन्ह्यांबाबत नागरिकांमध्ये अद्यापही अज्ञान असल्याचे सातत्याने दिसून येत आहे. त्यात सर्वसामान्यांसह उच्चशिक्षित अथवा बॅंकांमद्ये काम करणाऱ्यांचा देखील समावेश वेगवेगळ्या तक्रारींमधून उघड होत आहे. १०० ते २०० रुपयांना भुलून काहीजण लाखो रुपये अज्ञात व्यक्तीच्या सांगण्यावरून अज्ञात खात्यावर पाठवत आहेत. अशाच दोन घटना पुन्हा एकदा समोर आल्या असून दोघेही कोपर खैरणे परिसरात राहणारे आहेत. मकरंद गुंडगे यांना पार्ट टाईम कामाद्वारे पैसे कमवण्याचा मॅसेज आला होता. त्यामध्ये दोन ब्लॉगर्सला फॉलो करून २१० रुपये त्यांनी कमवले असता फायदा होत असल्याचा त्यांचा विश्वास बसला. यामुळे टप्प्या टप्प्याने त्यांनी २८ लाख ९० हजार रुपये भरले असता अधिक पैशाची मागणी होऊ लागली. दरम्यान नफा मिळायचे बंद झाल्याने फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याचवेळी इन्कम टॅक्सच्या कारवाईचा धाक दाखवून देखील त्यांच्याकडून पैसे उकलण्यात आले. 

त्याच प्रकारे जयप्रकाश मंदेरना यांना क्रिप्टो करन्सीमध्ये ट्रेडिंग करून पैसे कमवण्याचा मॅसेज आला होता. त्याला प्रतिसाद दिल्यानं त्यांना वेगवेगळ्या लिंक पाठवून त्यामध्ये माहिती भरून घेण्यात आली. त्यांच्याकडून नफा मिळेल या अपेक्षेने त्यांनी तब्बल ८३ लाख १६ हजार रुपये वेगवेगळ्या खात्यावर पाठवले. मात्र दोघांनाही काही दिवसांनी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले असता पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार सायबर पोलिस ठाण्यात दोन्ही गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिस अधिक तपास करत आहेत. ऑनलाईन फसवणुकीच्या घटना सातत्याने घडत असून त्यात गुन्हेगारांची पद्धत मात्र एकच आहे. त्यानंतरही अनेकांना खात्यात लाखो रुपये असताना शंभर, दोनशे रुपयांचा मोह अनावर होत असल्याने सायबर गुन्हेगारांचे फावताना दिसून येत आहे.