शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्याच दिवशी पुस्तके मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 23:17 IST

सर्व शिक्षा अभियानांतर्गत पुस्तकांचे वितरण; यंदा एकात्मिक पुस्तकाची भर

- अरुणकुमार मेहत्रेकळंबोली : सर्व शिक्षा अभियानांतर्गत दरवर्षी पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके दिली जातात. पनवेल तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील ५१ हजार ३३ लाभार्थी विद्यार्थी आहेत. त्यात मराठी, हिंदी, गुजराती, सेमी इंग्लिश, उर्दू या माध्यमाच्या पुस्तकांचा समावेश आहे. सद्य:परिस्थितीत १ लाख ५० हजार ५४५ इतकी पुस्तके आली आहेत, तर उर्वरित ७५ हजार पुस्तके लवकरच मिळणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.शासकीय शाळेत सर्व शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना दरवर्षी मोफत पुस्तके दिली जातात. जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थीगळती होत असल्याने शासनाने पाच वर्षांपूर्वी सेमी इंग्लिश वर्ग सुरू केले. त्यामुळे शाळेच्या पटसंख्येत वाढ होण्यास मदत झाली आहे. यंदा कोरोनामुळे शाळा कधीपासून सुरू होणार आहेत, हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी शैक्षणिक वर्षाची तयारी करण्यात येत आहे.पनवेल तालुक्यात जिल्हा परिषद २४८, खासगी शाळा ८१, महापालिका शाळा ११ अशा एकूण ३४० शाळांतील ५१ हजार ३३ विद्यार्थ्यांना मराठी, इंग्रजी, गणित, समाजशास्त्र, विज्ञान, हिंदी, बालभारती या पुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे. आतापर्यंत १ लाख ५० हजार ५४५ पुस्तके आली आहेत, तर उर्वरित ७५ हजार पुस्तके लवकरच येणार असल्याचे गटशिक्षण अधिकारी नवनाथ साबळे यांनी सांगितले. यामध्ये १ ली ते ६ वीपर्यंतच्या सेमी इंग्लिश माध्यमाची गणित तसेच उर्दू विषयाची पुस्तके राहिली आहेत.ही पुस्तके पनवेल येथील के.व्ही. कन्याशाळेत सॅनिटायझर फवारणी करून ठेवण्यात आली आहेत. ती केंद्रप्रमुखाच्या मार्फत शाळेत पाठवण्यात येणार आहेत. शाळा सुरू झाल्यावर ती पुस्तके विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत.विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी होणारया वर्षी शासनाने पहिली ते सातवीपर्यंतच्या इयत्तेसाठी एकात्मिक पुस्तकाची निर्मिती केली आहे. यामध्ये ४ विषयांचे एकच पुस्तक तयार करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे ओझे कमी होणार आहे. हा पायलट प्रोजेक्ट यशस्वी झाल्यास त्याचा इतरत्र अवलंब केला जाणार आहे.