शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates : कोसळधारा! मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग; मध्य रेल्वेला फटका; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
2
"घाबरू नका, पण सतर्क राहा"; मुंबईत मे महिन्यात दररोज आढळताहेत कोरोनाचे ९ रुग्ण
3
जपानसारख्या महाशक्तीला मागे टाकणं एकेकाळी स्वप्न होतं.. आनंद महिंद्रांना आठवले जुने दिवस, सांगितलं नवं चॅलेंज 
4
१८ महिने राहु-केतु गोचर: ५ मूलांकांना दुपटीने लाभ, गुंतवणुकीत फायदा; सुख-समृद्धी-भरभराट!
5
Stock Market Today: सेन्सेक्स २०७ अंकांच्या तेजीसह उघडला, Nifty २५ हजार पार; 'या'मुळे बाजारात जोरदार तेजी
6
२०२५ मध्ये जगन्नाथ रथयात्रा कधीपासून होणार सुरू? लाखो भाविक येतात; पाहा, अद्भूत वैशिष्ट्ये
7
"राक्षसी विचारसरणीचे लोक", पाकिस्तानवर संतापला सुनील शेट्टी, 'बॉयकॉट तुर्की'वरही दिली प्रतिक्रिया
8
अनेकांना माहीत नाही घरबसल्या कमाईचा हा जुगाड, पत्नीच्या मदतीनं वर्षाला ₹१,११,००० इन्कम पक्की
9
"माझ्या सासरचे मला मारताहेत, मला वाचवा"; ४ महिन्यांपूर्वी प्रेमविवाह, आता उचललं टोकाचं पाऊल
10
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
11
आजचे राशीभविष्य: सोमवार 26 मे 2025; प्रिय व्यक्तीचा सहवास, वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल; असा असेल तुमचा आजचा दिवस 
12
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
13
"तुझा नंबर पाठव, फ्लर्ट करायची इच्छा झालीये", टीव्ही अभिनेत्रीला दिग्गज मराठी अभिनेत्याचा मेसेज, म्हणाली- "तुझ्या बायकोला..."
14
महाराष्ट्रावर ५.६ लाख कोटींचे कर्ज; मेट्रो, महामार्ग, स्मार्ट सिटीला चालना, राज्याची स्थिती इतरांपेक्षा अधिक चांगली
15
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
16
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
17
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
18
फक्त मनोरंजनासाठी पत्ते खेळणे हे अनैतिक वर्तन मानले जाऊ शकत नाही: सर्वोच्च न्यायालय
19
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
20
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील

बोगस डॉक्टर शांताराम आरोटे गजाआड

By admin | Updated: February 10, 2016 03:17 IST

पोलिसांनी बोगस डॉक्टरांविरोधात मोहीम सुरू केली असून नेरूळ सेक्टर ६ मधील दत्तात्रय आगदे नंतर दारावेमधील शांताराम आरोटे यालाही अटक केली आहे

नवी मुंबई : पोलिसांनी बोगस डॉक्टरांविरोधात मोहीम सुरू केली असून नेरूळ सेक्टर ६ मधील दत्तात्रय आगदे नंतर दारावेमधील शांताराम आरोटे यालाही अटक केली आहे. बिहारमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाची बोगस पदवी तयार करून तो १५ वर्षे या परिसरात दवाखाना चालवत होता. नवी मुंबईमधील बोगस डॉक्टरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नेरूळमधील बोगस डॉक्टर दत्तात्रय आगदे याने चुकीचे उपचार केल्यामुळे व्यवसायाने वकील असणाऱ्या उत्तम आंधळे यांचा मृत्यू झाला होता. आंधळे यांच्या परिवारातील सदस्यांनी याविषयी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. पोलीस उपआयुक्त शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता शिंदे अल्फांसो यांनी बिहारमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ मुझफ्फरपूरमधून कागदपत्रांची सत्यता पडताळणी केली असता सर्व कागदपत्रे बोगस असल्याचे निदर्शनास आले होते. यानंतर २५ नोव्हेंबरला आगदेला अटक केली होती. आगदेला अटक केल्यानंतर पोलिसांनी बिहारमधून पदवी मिळविलेल्या सर्व डॉक्टरांची माहिती महापालिकेकडून मागितली होती. शहरात ५ जणांनी बिहारमधून पदवी मिळविली असल्याचे निदर्शनास आले होते. या सर्वांची कागदपत्रे पालिकेकडून घेवून त्याची सत्यता तपासण्यासाठी बिहारमधील आंबेडकर विद्यापीठामध्ये पाठविली होती. दारावे गाव सेक्टर २३ मधील युनिक होम अपार्टमेंटमध्ये सन २००० पासून दवाखाना चालविणाऱ्या शांताराम नामदेव आरोटे याची पदवी बनावट असल्याची माहिती विद्यापीठाने दिली. यानंतर पोलिसांनी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय पत्तीवार यांच्याशी संपर्क साधून गुन्हा दाखल करण्यास सांगितले. महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश निकम यांनी पोलिसांच्या उपस्थितीमध्ये आरोटे याच्या दवाखान्यात जावून त्याच्या कागदपत्रांची छाननी केली. सर्व कागदपत्रे खोटे असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी त्याला त्याच्या राहत्या घरातून अटक केली.जुगार अड्ड्यानंतर आता बोगस डॉक्टर परिमंडळ एकचे उपआयुक्त शहाजी उमाप यांनी पदभार स्वीकारल्यापासून अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर धडक कारवाई सुरू केली आहे. जुगार व मटका अड्डे बंद केल्यानंतर आता शहरवासीयांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांविरोधात मोहीम उघडली आहे. शहरातील बोगस डॉक्टरांचा शोध सुरू केला असून जे आढळतील त्यांच्यावर तत्काळ कारवाई केली जाणार आहे. शहरातील बोगस डॉक्टरांची पडताळणी करण्यासाठी सर्व वैद्यकीय व्यावसायिकांच्या कागदपत्रांची पुन:पडताळणी करावी असे नवी मुंबई महापालिकेस कळविले आहे. नागरिकांनीही त्यांना शहरात बोगस डॉक्टर व्यवसाय करत असल्याची माहिती मिळाली तर पोलिसांना तत्काळ माहिती द्यावी. - शहाजी उमाप, पोलीस उपआयुक्त, परिमंडळ १