शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयात बोगस जामीनदारांचा सुळसुळाट; न्यायाधीशांच्या सतर्कतेमुळे टळला प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 01:37 IST

बोगस जामीनदार तयार करून अटकेतील आरोपींना जामिनावर सोडवण्याचे प्रयत्न होत असल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत.

सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : वेगवेगळ्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपींना जामिनावर सोडवणारी टोळी सक्रिय असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांच्याकडून बनावट कागदपत्रांच्या आधारे बोगस जामीनदार तयार करून आरोपींना सोडवले जात आहे. शुक्रवारी असाच एक प्रकार न्यायाधीशांच्याच सतर्कतेमुळे उघडकीस आला आहे. 

बोगस जामीनदार तयार करून अटकेतील आरोपींना जामिनावर सोडवण्याचे प्रयत्न होत असल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. वाशी न्यायालयात यापूर्वी देखील असे प्रकार उघडकीस आले आहेत. बोगस जामीनदारच्या आधारे जामिनावर सुटलेले गुन्हेगार पुन्हा पोलिसांच्या हाती लागणे अवघड असते. त्यामुळे जामीन देताना न्यायालयाकडून बारकाईने जामीनदार पडताळला जातो. त्यानुसार महिला न्यायाधीश दि. दि. कोळपकर यांच्या सतर्कतेमुळे एका आरोपीचा जामिनावर सुटण्याचा प्रयत्न फसला आहे. याप्रकरणी बोगस जामीनदाराला सीबीडी पोलिसांनी अटक केली आहे.

मलंग मोहम्मद शेख (४८) असे अटक करण्यात आलेल्या बोगस जामीनदाराचे नाव आहे. तो अंबरनाथ येथे राहणारा असून मजूर कामगार आहे. एपीएमसी पोलीस ठाण्यातील २०१७ मधील एका गुन्ह्यात मनीष राठोडला अटक करण्यात आली आहे. तो सध्या न्यायालयीन कोठडीत असून त्याने जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर शुक्रवारी दुपारी न्यायालयात सुनावणी सुरू होती. यावेळी महिला न्यायाधीश दि. दि. कोळपकर यांना जामीनदारावर संशय आला. यामुळे त्यांनी जामीनदार व्यक्तींच्या नोंदी तपासल्या असता संपूर्ण प्रकार उघड झाला.

टोळी सक्रियवाशी न्यायालयात यापूर्वी देखील बोगस जामीनदार आढळून आले आहेत. यावरून न्यायालयीन कोठडीत असलेल्या गुन्हेगारांना सोडविण्यासाठी बोगस जामीनदार तयार करणारी टोळी सक्रिय असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांच्याकडून बनावट शासकीय कागदपत्रे तयार करून ती न्यायालयात सादर केली जात आहेत. त्याद्वारे न्यायालयाची देखील फसवणूक होत आहे.

तिघांना मिळवून दिला जामीनमलंगने मनीषला जामिनावर सोडविण्यासाठी जावेद खान या खोट्या नावाने बनावट कागदपत्रे सादर केली होती. त्यात शिधावाटप पत्रिका, कल्याण डोंबिवली पालिकेची कर पावती, शपथपत्र व आधार कार्ड यांचा समावेश होता. राठोडच्या वकिलांमार्फत सुनावणीसाठी हजर केले असता, न्यायाधीश कोळपकर यांना संशय आला. यामुळे त्यांनी जमीनदारांच्या नोंदी तपासल्या असता मलंगने यापूर्वी वेगवेगळ्या नावाने तिघांना जामीन दिल्याचे उघड झाले.

टॅग्स :Courtन्यायालय