शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
2
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
3
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
4
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
5
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
6
वयोवृद्ध जोडपं दहशतवाद्याशी भिडलं, अखेरीस एकमेकांच्या मिठीत सोडले प्राण, बोरिस आणि सोफियाची थरारक कहाणी
7
मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
8
IPL 2026 Auction: विस्फोटक फलंदाज आयपीएल २०२६ च्या मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड, नाव ऐकून चकीत व्हाल!
9
बाई, हा काय प्रकार... LinkedIn वर फुल-टाइम गर्लफ्रेंडची व्हॅकन्सी, लोक विचारतात सॅलरी किती?
10
सोनं १३०६ रुपयांनी स्वस्त, चांदीही घसरली; पटापट चेक करा कॅरेटनिहाय लेटेस्ट रेट
11
Jara Hatke: अजब प्रथा: 'या' गावात लग्नाआधी तोडले जातात वधूचे दात; पण का??? वाचा 
12
मनोज जरांगे पाटील यांनी दिल्ली गाठली; अमित शाह यांच्याकडे केली मोठी मागणी, नेमके काय घडतेय?
13
IPL Auction 2026 LIVE: केकेआरचा मोठा डाव, कॅमरून ग्रीनपाठोपाठ पतिरानावर लावली विक्रमी बोली
14
Budh Pradosh 2025: इंग्रजी वर्ष २०२५ मधील शेवटचे प्रदोष व्रत; कर्जमुक्ती, संतान प्राप्तीसाठी करा 'हे' उपाय
15
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉसह सरफराज खानला कुणीच दिला नाही भाव; सलग दुसऱ्यांदा 'अनसोल्ड'चा ठपका
16
खळबळजनक! लेकीच्या कस्टडीसाठी पतीने रचला भयंकर प्लॅन; टीव्ही अभिनेत्री पत्नीला केलं किडनॅप
17
नाईट क्लब आग प्रकरणी फरार लुथरा बंधूंना दिल्लीत आणले; थायलंडला पळून गेले होते
18
कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! मार्च २०२६ पूर्वी मिळणार मोठं गिफ्ट, सरकारनं दिली महत्त्वाची माहिती
19
सेकंदात तयार होणारी मॅगी कॅप्सूल खरी की खोटी? ४० मिलियन लोकांनी बघितलेल्या व्हिडीओचं सत्य काय?
20
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' जन्मतारखेच्या लोकांनी पायात काळा धागा बांधू नये; होतो दुष्परिणाम!
Daily Top 2Weekly Top 5

बोगस हजेरी लावणाऱ्यांचे रॅकेट उघडकीस; एनएमएमटीमधील कर्मचारी निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 00:02 IST

दोन वर्षांची हजेरीपत्रके घेतली ताब्यात : घोटाळ्याची चौकशी सुरू

नवी मुंबई : एनएमएमटीमध्ये गैरहजर कर्मचाऱ्यांची हजेरी लावून पैसे हडप करणारे रॅकेट उघडकीस आले आहे. या प्रकरणी एका कर्मचाºयाला निलंबित करण्यात आले असून एकास कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. दोन वर्षांचे हजेरीपत्रक ताब्यात घेण्यात आले असून त्याची तपासणी सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्या सर्वांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमामध्ये (एनएमएमटी) नवीन घोटाळा उघडकीस आल्यामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी हजेरी नोंद करणारा कर्मचारी अनंत तांडेल याला तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. हजेरी तपासणी करणाºया कर्मचाºयासही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. उपक्रमामध्ये वाहक पदावर नियुक्ती असलेला अनंत तांडेल याच्यावर काही वर्षांपासून चालकांची हजेरी नोंद करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती.नियमितपणे हजेरी नोंद करून हजेरीपत्रक तयार करणे व त्यानुसार वेतनपत्र तयार करण्याचे काम तो करत होता. आॅक्टोबर महिन्यामधील हजेरीपत्रक व पगारासाठी पाठविण्यात आलेल्या नोंदीची वही तपासली असता जवळपास १५ चालक गैरहजर असतानाही ते हजर असल्याचे भासविण्यात आले होते. हजेरीपत्रक तपासण्याची जबाबदारी असलेल्या महिला कर्मचाºयानेही न तपासता ते पुढे पाठविण्यात आले होते.हा प्रकार वरिष्ठांच्या निदर्शनास येताच तत्काळ हजेरी तपासनीस व अनंत तांडेल यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेऊन चौकशी समितीही नियुक्त करण्यात आली आहे. सोमवारी तांडेलला निलंबितही करण्यात आले आहे.परिवहन उपक्रमामधील दोन वर्षांतील हजेरीपत्रक तपासण्यासाठी ताब्यात घेण्यात आली आहेत. प्रत्येक हजेरीपत्रक व वेतनासाठी पाठविलेल्या यादीमधील तफावत तपासण्याचे काम केले जाणार आहे. तांडेल या विभागामध्ये कधीपासून कार्यरत होता तेव्हापासूनची कागदपत्रे तपासली जाणार आहेत. एक महिन्यामध्ये १५ चालक हजर नसताना त्यांना वेतन देण्याचा प्रयत्न केला आहे. किती वर्षांपासून हे रॅकेट कार्यरत आहे याची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. हजेरी लावणारे, तपासणारे यांच्यावर कारवाई होणार आहेच. याशिवाय ज्या कर्मचाºयांनी कामावर हजर नसताना वेतन घेतले त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे. हे रॅकेट कशा पद्धतीने सुरू होते. बोगस हजेरी लावण्यासाठी किती पैसे दिले व घेतले जात होते याचीही चौकशी होणार आहे. बोगस हजेरी लावून घेणाºया चालकांवरही कारवाई केली जाणार आहे. त्यांच्याकडून सर्व पैसे वसूल केले जाणार आहेत. याशिवाय उपक्रमाचे नुकसान केल्याबद्दल विभागीय चौकशी करून कडक कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.कारणे दाखवा नोटीसएनएमएमटीमध्ये बोगस हजेरी लावण्याच्या घोटाळ्यात सहभागी असण्याची शक्यता वाटणाºया सर्वांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. हजेरी तपासण्याची जबाबदारी असणाºया कर्मचाºयासही नोटीस देण्यात आली आहे. अनंत तांडेल याने पाठविलेल्या हजेरीपटामध्ये अनियमितता आढळून आली आहे. तांडेल याच्याशी अर्थपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यामध्ये आपला हलगर्जीपणा व बेजबाबदारपणा कारणीभूत आहे. हा प्रकार गंभीर असून तुमच्यावर शिस्तभंगाची कारवाई का केली जाऊ नये, असे नोटीसमध्ये स्पष्ट केले आहे.आॅक्टोबर महिन्याचे हजेरीपत्रक तपासले असता १५ चालक हजर नसतानाही ते हजर असल्याचे दाखविण्यात आल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधित कर्मचाºयास निलंबित केले आहे. काहींना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. यापूर्वीच्या हजेरीपत्रकांचीही तपासणी केली जाणार असून दोषींवर कडक कारवाई केली जाणार आहे.- शिरीष आरदवाड, परिवहन व्यवस्थापक, एनएमएमटीघोटाळेबाजांचे धाबे दणाणलेमहापालिका परिवहन उपक्रमामध्ये जवळपास २०७९ चालक व वाहक कार्यरत आहेत. वेगवेगळ्या शिफ्टमध्ये हे कर्मचारी काम करत आहेत.कर्मचाºयांची हजेरी नोंद करून घेण्यासाठी कर्मचाºयाची नियुक्ती केली आहे. पगार काढण्यापूर्वी हजेरीपत्रकाची तपासणी करण्यासाठीही नियुक्ती केली आहे.यानंतरही हा घोटाळा झालाच कसा, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. घोटाळा करणारे व लाभार्थी सर्वांवर कारवाई होणार असल्यामुळे घोटाळेबाजांचे धाबे दणाणले आहे.गुन्हे दाखल करण्याची मागणीएनएमएमटी उपक्रमाने एका कर्मचाºयास निलंबित केले असून इतरांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.संबंधितांकडून अपहार केलेल्या पैशाची वसुलीही केली जाणार आहे, परंतु एवढ्यावरच कारवाई थांबवू नये.उपक्रमाची आर्थिक फसवणूक करणाºयांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली जात आहे.15 चालक गैरहजर असतानाही ते हजर असल्याचे भासविण्यात आलेकिती वर्षांपासून हे रॅकेट कार्यरत आहे याची सखोल चौकशी करण्याचे आदेश

टॅग्स :nmmcनवी मुंबई महापालिका